Jal Jivan Mission Agrowon
ॲग्रो विशेष

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’च्या यशस्वितेसाठी लोकसहभाग महत्त्वाचा

Water Supply Scheme : जल हे जीवन असून निसर्गाने आपल्याला दिलेली ही देणगी आहे. देशातील सर्वांत जास्त ४० टक्के मोठी धरणे ही केवळ महाराष्ट्रात आहे.

Team Agrowon

Nashik News : जल हे जीवन असून निसर्गाने आपल्याला दिलेली ही देणगी आहे. देशातील सर्वांत जास्त ४० टक्के मोठी धरणे ही केवळ महाराष्ट्रात आहे. परंतु उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या दृष्टीने जलक्रांती घडवायची असेल तर जलजीवन मिशन यशस्वितेसाठी जलसंधारणाची जोड व लोकसहभाग अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नाशिक येथे जिल्हा परिषद, नाशिक आयोजित जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ जलरथ उद्‍घाटन सोहळाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, आमदार राहुल ढिकले, सीमा हिरे, देवयानी फरांदे, पाणीपुरवठा,

स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, मृद्‍ व जलसंधारण विभागाचे सचिव सुनील चव्हाण, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जलजीवन मिशन जि. प. प्रकल्प संचालक दीपक पाटील, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथा यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री भुसे, मंत्री पाटील यांची भाषणे झाली. जलजीवनच्या माध्यमातून ९८ टक्के शाळा व अंगणवाड्यांना पाणी जोडणीद्वारे पाणी पोहचले आहे. जलजीवन मिशनचे फायदे नागरिकांनी ओळखून या योजनांचे संवर्धन करावे असेही मंत्री पाटील यांनी या वेळी सांगितले.

महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल यात शंका नाही

या माध्यमातून २४ हजार गावात काम होणार असून, १६ हजार ४०५ पाणी साठे गाळ काढून पुनरुज्जीवित होणार आहेत. याचा फायदा ३ लाख २० हजार शेतकऱ्यांना थेट होणर आहे.२६७ लाख टँकर भरतील इतका पाणीसाठा याद्वारे तयार होणार आहे. अशा नियोजनातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल यात शंका नाही, असा विश्‍वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Grape Crop Protection: द्राक्ष पीक वाचविण्यासाठी खर्चात चौपट वाढ

Ginning Pressing Industry: जिनिंग प्रेसिंग कारखाने दीपोत्सवानंतर धडाडणार

Raisin Market: झीरो पेमेंटसाठी बेदाण्याचे सौदे एक महिना बंद

Farmer Relief Package: अतिवृष्टीच्या पॅकेजमध्ये शेतकरी कोरडाच

Maharashtra Rain: राज्यात विजांसह पावसाची अंदाज कायम

SCROLL FOR NEXT