Government Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Government Scheme : शासकीय योजनांची जलरथामार्फत जनजागृती

Jal Jivan Mission : जलशक्ती मंत्रालय भारत सरकार व राज्य शासन यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), जलजीवन मिशन आणि गाळयुक्त शिवार इत्यादी शासनाच्या विविध योजनांची जलरथामार्फत जनजागृती करण्यात येत आहे.

Team Agrowon

Pune News : जलशक्ती मंत्रालय भारत सरकार व राज्य शासन यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), जलजीवन मिशन आणि गाळयुक्त शिवार इत्यादी शासनाच्या विविध योजनांची जलरथामार्फत जनजागृती करण्यात येत आहे.

या जलरथाला जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे यांनी जिल्हा परिषद येथे हिरवा झेंडा दाखवून या अभियानाचा प्रारंभ केला.

या वेळी जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक अप्पासाहेब गुजर, भारतीय जैन संघटनेचे समन्वयक नितीन शहा व त्याची संपूर्ण टीम व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जलरथ जिल्ह्यातील एकूण १ हजार ३८५ ग्रामपंचायतीमध्ये भेट देणार आहे. स्वच्छ भारत मिशनमध्ये एकूण १ हजार ८४३ गावांपैकी १ हजार ४०१ गावे स्वच्छ भारत मिशन टप्पा २ अंतर्गत हागणदारी मुक्त अधिक म्हणून घोषित करण्यात आली आहे.

मार्च २०२४ अखेर सर्व म्हणजे १ हजार ८४३ गावे हागणदारीमुक्त घोषित करण्याचा संकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे.

जिल्ह्यांतील १३ तालुक्यांतील सर्व १ हजार ८४३ गावांत जलरथामार्फत योजनांची माहिती देण्यात येणार असून, प्रत्येक तालुक्यात एक चित्ररथ फिरणार आहे, अशी माहिती श्री. गुजर यानी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parliament Winter Session 2025: हिवाळी अधिवेशन २०२५: संसद पुढील अधिवेशन काळापर्यंत तहकूब; आठ महत्त्वाच्या विधेयकांना मंजुरी

Soybean Farmers Protest: हमीभावासाठी किसान मोर्चाचे लातूर बाजार समितीसमोर धरणे

Rabi Crop Insurance: रब्बी पीकविम्याकडे शेतकऱ्यांची पाठ

Natural Sugar Factory: शेतकऱ्यांना ‘एआय’चा फायदा देणारा ‘नॅचरल’ राज्यातील पहिला कारखाना: राजकुमार मोरे

Climate Change: बदलत्या हवामानास अनुकूल वाणांच्या निर्मितीची गरज

SCROLL FOR NEXT