Oranges Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Farmers Issue : व्यापार अधिसूचित समावेश करून संत्रा उत्पादकांना दिलासा द्या

Nitin Gadkari : देशांच्या व्यापार धोरणांतर्गंत बांग्लादेश सरकारच्या अधिसूचीमध्ये संत्र्याचा समावेश करून नागपुरी संत्रा उत्पादकांना दिलासा देण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

Team Agrowon

Nagpur News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहीत दोन्ही देशांच्या व्यापार धोरणांतर्गंत बांग्लादेश सरकारच्या अधिसूचीमध्ये संत्र्याचा समावेश करून नागपुरी संत्रा उत्पादकांना दिलासा देण्याची मागणी केली आहे.

केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या पत्रानुसार, विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या संत्र्याखाली एक लाख हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यावरून हे विदर्भाचे मुख्य फळपीक असल्याचे स्पष्ट होते. या लागवड क्षेत्रातून आंबीया आणि मृग बहारात मिळून १० लाख टनाची उत्पादकता मिळते. संत्रा उत्पादकांच्या मुख्य उत्पनाचा हाच एकमेव स्रोत असल्याचे यावरून स्पष्ट होते.

काही शेतकरी कंपन्यांकडून बांगलादेशला रस्ते मार्गाने संत्रा निर्यात केली जाते. मेहंदीपूर, गुजडांगा, बेनापोल अशा मार्गाने संत्रा बांग्लादेशला पोहोचतो. २०१९ मध्ये बांग्लादेशकडून प्रती किलो आयात शुल्क २० रुपये आकारले जात होते. त्यानंतर २०२० मध्ये ३० रुपये, २०२१ मध्ये ५१, २०२२ मध्ये ६३ आणि आता ते थेट ८८ रुपये प्रती किलो इतके करण्यात आले आहे.

परिणामी बांग्लादेशला होणारी नागपुरी संत्र्याची निर्यात प्रभावित झाली. त्याचा परिणाम संत्रा फळांना मिळणाऱ्या दरावर झाला आहे. देशाअंतर्गंत बाजारपेठेत दर कोसल्याने संत्रा उत्पादकांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. याची दखल घेत सक्षम वाणिज्य मंत्री म्हणून आपण बांग्लादेश दूतावासातील अधिकाऱ्यांशी चर्चा करावी.

त्याआधारे आयात शुल्क निदान ५० टक्क्यांपर्यंत कमी करण्यास सांगावे. त्यासोबतच भारत सरकार आणि बांगलादेश सरकार यांच्यात व्यापार करारांतर्गंत संत्र्याचाही बांग्लादेश सरकारच्या अधिसूचित समावेश करावा.

या माध्यमातून आयात शुल्कात सवलत मिळविता येणार आहे. बांगलादेश-भुतानमध्ये काही जिनसांकरिता आयात-निर्यात शुल्क मुक्‍त व्यापाराचे धोरण आहे. त्याच धोरणानुसार भारतालाही सवलत मिळणे गरजेचे आहे.

कोरोना काळात केंद्र सरकारच्या पुढाकाराने संत्रा वाहतुकीकरिता ५० टक्‍के अनुदानावर किसान रेल्वेचा उपक्रम राबविण्यात आला आहे. तशा प्रकारचा उपक्रम निर्यातीकरिताराबविल्यास त्याचाही फायदा संत्रा उत्पादकांना होणार आहे, असेही गडकरी यांनी पत्रात नमूद केले आहे.

आमदार भुयार यांच्या पत्राची दखल

वरुड-मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी गेल्या आठवड्यात याच मुद्द्यावर श्री. गडकरी यांची भेट घेतली होती. त्याचा संदर्भ देत त्यांनी हा पत्रव्यवहार केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Poultry Industry : फ्रोझन चिकनवरील जीएसटी हटवण्याची मागणी

UP Kharif Sowing: उत्तर प्रदेशात यावर्षीच्या खरीप हंगामात बंपर पीक उत्पादन अपेक्षित

Marathwada Water Storage: मराठवाड्यात ११ मोठ्या प्रकल्पांत १७६ टीएमसी उपयुक्त साठा  

Turmeric Varieties: सरस उत्पादकतेचे हळदीचे वाण विकसित करणार

Agricultural Development: कृषी आराखड्यात अधिकारी, कर्मचारी महत्त्वाचा दुवा

SCROLL FOR NEXT