Congress Delegation Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Issue : शेतकऱ्यांना तातडीने मदत करा

Congress Delegation : विदर्भ आणि मराठवाडा येथे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. परंतु मदत मिळाली नाही. यामुळे जनतेमध्ये, शेतकरी वर्गात प्रचंड प्रमाणात अस्वस्थता आहे. त्यामुळे तातडीने मदत करावी, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे केली.

Team Agrowon

Mumbai News : विदर्भ आणि मराठवाडा येथे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. परंतु मदत मिळाली नाही. यामुळे जनतेमध्ये, शेतकरी वर्गात प्रचंड प्रमाणात अस्वस्थता आहे. त्यामुळे तातडीने मदत करावी, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे केली. राज्यातील कायदा सुव्यव्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शनिवारी (ता. २१) शिष्टमंडळाने राज्यपालांना निवेदन देऊन चर्चा केली.

यावर राज्यपाल राधाकृष्णन यांनी कारवाई आणि कार्यवाहीचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह आमदार, खासदारांचा समावेश होता. राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की मराठवाड्यात अतिवृष्टी झाली,

शेतकऱ्यांचे सहा लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. अजूनही याचे पंचनामे झालेले नाहीत. केंद्रीय कृषिमंत्री यांनी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याचे दौरे करून मदत जाहीर केली. पण महाराष्ट्रात मात्र अजूनही केंद्रीय कृषिमंत्री किंवा केंद्रीय पथक पाहणी करण्यास आले नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबाबत इतका दुजाभाव का? या राज्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा दिसत नाही का? त्यांना मदत करण्याची केंद्र आणि राज्य सरकारची भूमिका नाही.

‘राहुल गांधींच्या जिवाला धोका’

निवेदनात पुढे म्हटले आहे, ‘महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला असून या बाबत कारवाई झालेली नाही. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात हिंसक विधाने सत्ताधारी गटाचे आमदार संजय गायकवाड आणि खासदार अनिल बोंडे यांनी केली आहेत.

विरोध करताना जिवाला धोका निर्माण करणे, हिंसेला प्रवृत्त करण्याची भाषा लोकप्रतिनिधींनी वापरणे हे कायद्याला धरून नाही. या प्रकरणात मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी आणि पोलिसांनी खेदाने बघ्याची भूमिका घेतली. या दोघाही लोकप्रतिनिधींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. महाराष्ट्रात प्रक्षोभक विधान करून देखील आमदारावर पोलिस कारवाई करत नाही याचा अर्थ राज्यात दंगली घडवण्याचा सत्ताधारी पक्षांचा कट आहे, असा आरोपही करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bihar Election Results 2025: बिहारमध्ये एनडीए २०० पार, 'महागठबंधन'चा सुपडासाफ, नितीश कुमारांचे PM मोदींना नमन

Organic Farming: कृषी विद्यापीठाचा जैविक शेती संशोधनासाठी सामंजस्य करार

Cotton Procurement: ‘सीसीआय’च्या खरेदीअभावी शेतकऱ्यांचे शोषण

Mango Flowering: रायगडमध्ये थंडीमुळे हापूसचा मोहर बहरला

Seed Distribution : महाबीजच्या वितरकांकडून मिळणार अनुदानावरील रब्बी बियाणे

SCROLL FOR NEXT