Bharat Krishak Samaj Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : पंचनामे करून आर्थिक मदत द्या

Crop Survey : नुकसानाचे ताबडतोब पंचनामे करून आर्थिक मदत दिली जावी, अशी मागणी भारत कृषक समाजातर्फे कृषी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

Team Agrowon

Akola News : हाता-तोंडाशी आलेले पीक अवकाळी पाऊस, वादळाने हिरावून घेतले. या वर्षी शेतकरी सातत्याने निसर्गाच्या माऱ्याला सामोरा जात आहे. दोन दिवसांत पातूर तालुक्यासह इतरही भागात खूप नुकसान झाले.

या नुकसानाचे ताबडतोब पंचनामे करून आर्थिक मदत दिली जावी, अशी मागणी भारत कृषक समाजातर्फे कृषी आयुक्तांकडे करण्यात आली आहे. कृषक समाजाचे महाराष्ट्र चेअरमन डॉ. प्रकाश मानकर व पदाधिकाऱ्यांनी पातूर तालुक्यात नुकसानग्रस्त भागात भेट दिली.

याबाबत डॉ. मानकर म्हटले, की यंदा वारंवार नैसर्गिक आपत्तीने शेतकरी त्रस्त झालेला आहे. खरिपाच्या सुरुवातीपासून तर आता रब्बी हंगामात अतिवृष्टी, गारपीट, वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.

केळी, आंबा, पपई तसेच लिंबूची झाडे मोठ्या प्रमाणात कोलमडून पडले. कांदा, कांदा बिजोत्पादन, गहू, ज्वारी, उन्हाळी मूग या पिकांचेही मोठ्या प्रमाणात सगळीकडे नुकसान झाले आहे. तरी शासनाने निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन ताबडतोब पंचनामे करून आर्थिक मदत देण्यासाठी कार्यवाही करावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा मागणी आहे.

कृषक समाजातर्फे डॉ. मानकर यांच्यासह डॉ. रमेश ठाकरे, प्रशांत चौधरी, वसंतराव महाजन, जगतराव पाटील, शेषराव पाटील, विश्वासराव भोसले, गोविंद रोकडे यांनी कृषी आयुक्त व कृषी सचिवांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT