Crop Damage Compensation : खरे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित

Heavy Rain Crop Damage : गेल्या खरीप हंगामात अतीवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला.
Crop Damage Compensation
Crop Damage CompensationAgrowon
Published on
Updated on

Gondia News : गेल्या खरीप हंगामात अतीवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. अनेकांच्या खात्यात तो जमा झाला असला तरीहीू चुकीच्या सर्व्हेक्षणामुळे अनेक नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहिले. त्यामुळे बोगस पंचनामे करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सालेकसा तहसील कार्यालयवर धडक देत शेतकऱ्यांनी ही मागणी केली. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनानूसार, गेल्या खरीप हंगामाच्या दरम्यान अतिवृष्टी झाली. त्याच्या परिणामी नदी-नाल्यांना पूर आला. हे पाणी काठावरील शेतात शिरल्याने धानपीक पाण्यात बुडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी भरपाई मिळावी याकरीता सातत्याने पाठपुरावा केला.

Crop Damage Compensation
Crop Damage Compensation : चार वर्षानंतर मिळणार शेतकऱ्यांना भरपाई

त्याची दखल घेत शासनाकडून सर्व्हेक्षण व पंचनाम्याचे आदेश देण्यात आले. त्याआधारे प्रशासनाकडून नंतर शासनाला अहवाल सादर करण्यात आला. या प्रक्रियेत काही गावात तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांनी प्रत्यक्ष बांधावर जात पंचनामे केले.

Crop Damage Compensation
Crop Damage Compensation : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सव्वातीन कोटींची मदत

परंतु अनेक गावातील तलाठी, ग्रामसेवक तसेच कृषी सहाय्यकांनी बांधावर न जाताच आपल्या मर्जीनूसार बोगस अहवाल तयार करुन शासनाकडे पाठविल्याचा आरोप आहे. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांना भरपाईपासून वंचित राहावे लागले.

याप्रकारामुळे संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक देत बोगस पंचनामे करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. सालेकसा तालुक्‍यातील दरबडा, सोनपुरी, पिपरिया, धानोली, कावराबांध परिसरतील अनेक शेतकऱ्यांना बोगस पंचनाम्याच्या परिणामी भरपाईपासून वंचित राहावे लागल्याचा आरोप आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com