Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांचे विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन; उपमुख्यमंत्र्यांचे तातडीने मदतीचे आश्वासन

राज्यात दोन दिवस झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे हाततोंडचा घास हिसकवला आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.

Team Agrowon

"शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे" "कोण म्हणत देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही" घोषण देत विधानभवनच्या पायऱ्यांवर बुधवारी (ता.८) विरोधकांनी आंदोलन केले.

राज्यात दोन दिवस झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे हाततोंडचा घास हिसकवला आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.

राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या पाचव्या दिवशीचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

राज्याच्या बहुतांश भागात गारपीट, वादळी वारे आणि पावसाने शेतकऱ्यांने मोठे नुकसान झाले आहे.

हरभरा, गहू, द्राक्ष, कांदा, आंबा, काजू, संत्रा, मोसंबी आणि भाजीपाला पिकाला फटका बसला आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशा घोषणा देत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली.

यावेळी विधानसभा विरोधीपक्षनेते अजित पवार, विधानपरिषद विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, चेतन तुपे मनीषा कायंदे आदि उपस्थित होते.

दरम्यान, कामकाजला सुरुवात झाल्यानंतर विरोधी पक्षाने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानीचे पूर्ण माहिती अजून मिळाली नाही. पूर्ण माहिती मिळाल्यानंतर निर्णय घेऊ.

तसेच शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT