MPSC Student Protest Agrowon
ॲग्रो विशेष

MPSC Student Protest : ‘‘एमपीएससी’च्या परीक्षेत ‘कृषी’च्या पदांचा समावेश होईपर्यंत आंदोलन’’

MPSC Student Demands : ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांचे मंगळवारपासून आंदोलन सुरू आहे.

Team Agrowon

Pune News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) येत्या २५ ऑगस्टला घेण्यात येणारी पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात यावी, तसेच या परीक्षेत कृषी विभागाच्या २५८ पदांचा समावेश करावा, या मागण्यांवरून ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांचे मंगळवारपासून आंदोलन सुरू आहे.

मात्र गुरुवारी (ता.२२) आयोगाने पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असला, तरी ‘कृषी’च्या पदांबाबत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय काही विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

पुण्यातील शास्त्री रोडवरील अहिल्या अभ्यासिकेसमोर मंगळवारी (ता. २०) रात्रीपासून ठिय्या आंदोलन केले. ते गुरुवारीही सुरू होते.

या आंदोलनाला माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी ‘एक्स’(ट्विटर)वर मत व्यक्त करून पाठिंबा दिला होता. तसेच आमदार रोहित पवार, रूपाली पाटील ठोंबरे, आपचे मुकुंद कीर्दत यांनीही विद्यार्थ्यांची भेट देत आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT