Rahul Gandhi Agrowon
ॲग्रो विशेष

Congress Protest : काँग्रेसतर्फे धुळ्यात तीव्र निदर्शने

केंद्रातील मोदी सरकारने हुकूमशाही पद्धतीने गांधी यांची खासदारकी रद्द केल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला.

Team Agrowon

Dhule Congress News : मोदी सरकारने काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी शहरातील काँग्रेस भवनासमोर तीव्र निदर्शने केली, तसेच रास्ता रोको आंदोलन केले.

केंद्रातील मोदी सरकारने हुकूमशाही पद्धतीने गांधी यांची खासदारकी रद्द केल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला.

खासदार गांधी यांना दोन दिवसांपूर्वी सुरत (गुजरात) न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकारने हुकूमशाही तंत्राचा वापर करीत त्यांची खासदारकी रद्द केली.

या निषेधार्थ प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरात काँग्रेस भवनाजवळ आंदोलन झाले. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्राच्या दडपशाहीविरोधात घोषणाबाजी केली.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, शहराध्यक्ष डॉ. अनिल भामरे, राज्य सरचिटणीस युवराज करनकाळ, ज्येष्ठ रमेश श्रीखंडे, गुलाबराव कोतेकर, जिल्हा काँग्रेस सचिव डॉ. दरबारसिंग गिरासे, भगवान गर्दे, बाजीराव पाटील, पंढरीनाथ पाटील, तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष अशोक सुडके, प्रदीप देसले, राजेंद्र भदाणे, शहर काँग्रेस कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसैन, बापू खैरनार, महिला काँग्रेस अध्यक्षा गायत्री जयस्वाल, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे, राजेंद्र देवरे, भिवसन अहिरे, हरिभाऊ चौधरी, जावेद मल्टी, छोटूभाऊ चौधरी, आदींसह काँग्रेसप्रणीत विविध संघटना सहभागी झाल्या.

श्री. सनेर म्हणाले, की खासदार राहूल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा यशस्वी झाली. देशातील कोट्यवधी जनता काँग्रेसशी जोडली गेली. हीच भीती भाजपला सतावत असल्याने गांधी यांची खासदारकी रद्द केली. मात्र, काँग्रेसचा कार्यकर्ता शांत बसणार नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crushing Season: शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीची शासनाची भूमिका

Sugarcane Crushing Season: एकरी शंभर टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवा

Hasan Mushrif: शेतकरी कर्जबाजारीच होऊ नये यासाठी उपाययोजना करा : मंत्री हसन मुश्रीफ

Agri Stack: भरपाईसाठी ई-केवायसी रद्द, पण ‘फार्मर आयडी’ अनिवार्य

Farm Roads: अहिल्यानगरमधील शेत, शिव,पाणंद रस्त्यासाठी विशेष मोहीम

SCROLL FOR NEXT