Sangli News: जत तालुक्यातील १२३ महसुली गावांपैकी ५४ गावांची २०२५-२६ ची खरीप पिकाची अंतिम पैसेवारी महसूल प्रशासनाच्या वतीने नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यानुसार तब्बल जत तहसील ४६, तर संख अप्पर तहसीलकडील ८ अशा ५४ गावांची पैसेवारी ५० पैशांहून कमी असल्याचे समोर आले आहे. यामुळे नुकसानग्रस्त गावांना शासनाकडून काय मिळणार, याकडे लक्ष आहे..जत तालुक्याकडे कायम दुष्काळी भाग म्हणून पाहिले जाते. मात्र, यंदा तालुक्यात पावसाने सरासरीपेक्षा जास्त हजेरी लावली. सप्टेंबरअखेर १७७. १ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून १०४.९ टक्के सरासरी गाठली. त्यामुळे जत तालुक्यातील खरीप हंगामात बाजरी, मका, तूर, उडीद यासह प्रमुख पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला..Government Remuneration: हक्काचा शासकीय मोबदला वर्षानुवर्षे मिळेना .यंदा खरीप हंगामात बाजरी ३२ हजार ८९७ हेक्टर, मका २० हजार ३८२ हेक्टर, तूर ११ हजार हेक्टर व उडीद ७ हजार ९७६ हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरण्या घेतल्या होत्या. मात्र, अतिवृष्टीने शेतात पाणी साचून राहिले. .Revenue Department Reform: दस्त नोंदणी चुकल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार: चंद्रशेखर बावनकुळे.यामुळे प्रचंड प्रमाणात तण,कीड, कूज, अशाने पिकावर मोठा परिणाम जाणवला. ५० पैशांच्या आत खरीप पिकांची हंगामी पैसेवारी आलेल्या जत तालुक्यातील गावाच्या संख्येवरून यंदा उत्पादन आणि उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट असल्याचे स्पष्ट होत आहे..शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा....ज्या गावाची पैसेवारी पन्नास टक्क्यांपेक्षा कमी आलेली आहे, त्या गावात कर्जमाफी, पीकविमा, जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जांचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जांच्या वसुलीला स्थगिती, कृषिपंपांच्या वीज बिलात सवलत, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफी, रोजगार हमी योजनांच्या कामाच्या निकषात शिथिलता, अशा सवलती लागू होता. त्यामुळे शासन या शेतकऱ्यांना काय मदत जाहीर करणार, याची प्रतीक्षा शेतकऱ्यांमध्ये आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.