Kolhapur News: कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका निवडणुकीत जागा वाटपावरुन एकमत न झाल्याने इंडिया आघाडीतूनराष्टवादी (शरद पवार गट) बाहेर पडला आहे. इंडिया आघाडीत बिघाडीला कांग्रेसचे आमदार सतेज पाटीलच ठरल्याचा आरोप राष्ट्वादीकडून करण्यात आला आहे..कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसकडून सुरु असलेले राजकारण चुकीचे आहे. आमदार सतेज पाटील यांच्या ‘मी म्हणेल ती पूर्व दिशा’ या एकाधिकारशाहीमुळेच आमच्या पक्षाला आघाडीत स्थान मिळू शकले नाही. त्यामुळेच ‘इंडिया’आघाडीतून बाहेर पडून राजर्षी शाहू आघाडी केली, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला..Local Body Elections: सोलापुरातील ७०१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका रखडणार.व्ही. बी. पाटील म्हणाले, इंडिया आघाडीचा घटक म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सन्मानजनक जागा मिळाल्या पाहिजे होत्या. पक्षाकडून १४ जागांची मागणी करुन ११ जागांवर खाली येऊनही आमदार सतेज पाटील यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. .Local Body Elections: परभणीत सात, हिंगोलीत दोन नगर परिषदांसाठी उत्साहात मतदान.त्यांच्याकडून आपल्या जवळचा माणूस व पैसेवाला उमेदवार असा उमेदवारीचा लावलेला निकष चुकीचा आहे. त्यामुळे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची भेट घेऊन याबाबत सांगितले. त्यांनासुध्दा हा प्रकार आवडलेला नाही. त्यांनीच आम्हाला पुढचा विचार करा, असे सांगितल्यानेच हा निर्णय घेतला. .सतेज पाटील यांनी खासदार श्रींमत शाहू छत्रपती महाराज यांच्या शब्दाला ही किंमत दिली नाही. राजर्षी शाहू आघाडीच्या माध्यमातून महापालिका निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीचा भ्रष्टाचार मोडून काढण्याचे काम केले जाईल. उमेदवारी देताना कोणतेही आर्थिक व्यवहार न करता कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम केले जाईल. ही आघाडी पुढील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ही राहणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.