Water Crisis  Agrowon
ॲग्रो विशेष

Jayakwadi Dam : जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी १६ नोव्हेंबर रोजी परभणीत आंदोलन

Team Agrowon

Parbhani News : जिल्ह्यात अपुऱ्या पावसामुळे दुष्काळी स्थिती उद्भवली आहे. जायकवाडी डाव्या कालव्याच्या दोन‌ आवर्तनावर भागणार नाही. आणखी आवर्तने सोडण्यासाठी वरच्या धरणातून जायकवाडी धरणात २० टीएमसी सोडण्यात यावे या मागणीसाठी गुरुवारी (ता. १६ ) परभणी येथे विविध पक्षांतर्फे आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती आमदार सुरेश वरपुडकर यांनी दिली.

जायकवाडी पाणी हक्क संघर्ष समितीतर्फे बुधवारी (ता.८) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेतकरी भवन सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. जायकवाडी पाणी हक्क संघर्ष समिती कॉम्रेड राजन क्षीरसागर, शिवसेना ठाकरे गट जिल्हा प्रमुख विशाल कदम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले, कॉग्रेसचे भगवान वाघमारे, अमोल जाधव, रामभाऊ घाडगे, बाळासाहेब रेंगे, पंजाब देशमुख, सोनाली देशमुख आदी उपस्थित होते.

क्षीरसागर म्हणाले, की यंदाच्या खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थितीमुळे जायकवाडी प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा होवू शकला नाही. मराठवाड्यातील सर्व धरणात अपुरा पाणीसाठा आहे. या पार्श्वभूमीवर २०१४-१५ सालच्या न्यायालयीन निवाड्यानुसार व मजनिप्रा कायदा २००५ च्या तरतुदीनुसार जायकवाडी प्रकल्पात वरच्या बाजूच्या विविध धरणातून ८.५ टिएमसी पाणीसाठा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे.

याबद्दल रीतसर आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जारी केले आहेत मात्र नगर व नाशिक जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाचे आमदार, पालकमंत्री हे विरोध करीत आहेत. यामुळे ३१ऑक्टोबर पर्यंत समन्यायी पाणी वाटप करण्याच्या न्यायालयीन आदेशाचा भंग करण्यात आलेला आहे. पाटबंधारे मंत्री याबद्दल चुप्पी साधून आहेत. हा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयात नेवून कायदेशीर अडथळे निर्माण करण्याचा खेळ सत्ताधारी यांनीच सुरु केला आहे.

यातून परभणी, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा व गंगाखेड तालुक्यात गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. कायमचे नुकसान होण्याची शक्यता आहे. याबद्दल परभणी जिल्ह्यातील जनतेची एकजूट करून आंदोलनात्मक कृती व न्यायालयीन हस्तक्षेप आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, आजी माजी सदस्य, संचालक, शेतकरी आंदोलक, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, उद्योजक यांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT