Kunbi Report : कुणबी दाखले देण्यासाठी पुराव्याची तपासणी करावी

Maratha Kunbi Certificate : जिल्ह्यात मराठा समाजाला कुणबी दाखले वितरित करण्यासाठी बारा प्रकारच्या पुराव्याची तपासणी करण्यासाठी तालुकास्तरावर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापित करण्यात आलेली आहे.
Kunbi Report Committee
Kunbi Report CommitteeAgrowon

Solapur News : जिल्ह्यात मराठा समाजाला कुणबी दाखले वितरित करण्यासाठी बारा प्रकारच्या पुराव्याची तपासणी करण्यासाठी तालुकास्तरावर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापित करण्यात आलेली आहे. या समितीने पुराव्याची तपासणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

जिल्हास्तरावर निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आलेल्या आहे.

Kunbi Report Committee
Cotton Crop : पूर्वहंगामी कापसाचे क्षेत्र रिकामे करण्यास सुरुवात

संबंधित तहसीलदार हे त्या समितीचे सहअध्यक्ष असतील. या समितीमध्ये गटविकास अधिकारी पंचायत समिती, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, उपनिबंधक सहकारी संस्था, उपअधीक्षक भूमी अभिलेख, मुख्याधिकारी नगरपालिका यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आलेला आहे.

तालुकास्तरीय समितीमध्ये अन्य विभागाचे अधिकारी आवश्यक असल्यास समिती अध्यक्षाने त्यांचा समितीत समावेश करावा. या समितीने तहसील कार्यालयात मराठा कुणबींचे पुरावे गोळा करण्यासाठी व दाखला देण्यासाठी तालुका स्तरावर मदत कक्ष स्थापन करावा.

Kunbi Report Committee
Drought Condition : रब्बी तर सोडाच, माणसे-जनावरेही जगवणे मुश्कील

या समितीने गाव पातळीवरील अभिलेखाचा शोध घेण्यासाठी गावस्तरीय समितीची नेमणूक करावी, समितीने कुणबी मराठा पुरावे कार्यालयात शोधून पुरावे व विहित नमुन्यातील अहवाल समिती अध्यक्ष व सहअध्यक्ष यांच्याकडे सादर करावेत. अध्यक्ष व सहअध्यक्षांनी कुणबी दाखले वितरण करण्याबाबत शासन नियम व सुधारित शासन निर्णयानुसार पुढील कार्यवाही करावी, अशा सूचना आशीर्वाद यांनी दिल्या.

१९४८ पूर्वीच्या अभिलेखांची तपासणी

मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत शासकीय विभागांनी १९४८ पूर्वीचे तसेच १९४८ ते १९६७ पर्यंतच्या विविध शासकीय अभिलेखांची तपासणी करून त्यामध्ये कुणबी नोंदी असलेली कागदपत्रे शोधून काढावीत. जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग, महसूल विभाग, शिक्षण विभाग, राज्य उत्पादन शुल्क, कारागृह अधीक्षक, पोलिस विभाग, रेल्वे विभाग, सह जिल्हा उपनिबंधक, भूमी अभिलेख, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जिल्हा वक्फ अधिकारी कार्यालय, महापालिका व नगरपालिका या विभागाने उपरोक्त कालावधीतील सर्व अभिलेखांची तपासणी करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com