Farmer Protest
Farmer Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Bhakti Highway : भक्ती महामार्ग रद्दसाठी ४६ गावांतील शेतकऱ्यांचा थाळीनाद

 गोपाल हागे

Buldana News : शेगाव ते सिंदखेडराजा हा भक्ती महामार्ग शासनाने रद्द करावा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. जिल्ह्यातील ४६ गावांतील शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. २७) थाळीनाद केला. राज्यात सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशन काळात याबाबत घोषणा व्हावी, महामार्ग रद्द केला जावा, अशी मागणी करीत शेतकरी व महामार्ग विरोधी समितीने यापूर्वीच इशारा दिला होता. आता एक जुलैला शेतकरी लाक्षणिक उपोषण/आत्मक्लेश आंदोलन करणार आहेत.

महामार्ग रद्द करण्याच्या मागणीकडे अधिवेशन काळात सरकारचे लक्ष वेधण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांनी थाळीनाद आंदोलन केले. प्रस्तावित असलेला हा सिंदखेडराजा-शेगाव महामार्ग रद्द करण्यात यावा यासाठी गेले काही महिने शेतकरी सातत्याने आंदोलने करीत आहेत. प्रशासन, लोकप्रतिनिधींना निवेदने देण्यात आली.

बैठकाही झाल्या. मात्र, महामार्ग रद्द न केल्याने आंदोलन सुरू झाले आहे. थाळीनाद आंदोलनात अंढेरा, सेवानगर, अंत्रीखेडेकर, गांगलगाव, पांढरदेव, करतवाडी, घानमोडी, मानमोडी, टाकरखेड मुसलमानसह अनेक गावांतील शेतकरऱ्यांनी सहभाग घेत महामार्गाला एकजुटीने विरोध दाखवला.

‘कृती समितीचा एकच नारा - महामार्ग रद्द करा’, अशा घोषणाही या वेळी देण्यात आल्या. या आंदोलनात गावोगावच्या शेतकऱ्यांसमवेत देविदास पाटील, डॉ. सत्येंद्र भुसारी, ज्योतीताई खेडेकर, विनायक सरनाईक, नितीन राजपूत, मुरलीधर येवले, रमेश कणखर आदी सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच समाधान म्हस्के, मधुकर सपकाळ, चेतन म्हस्के, नितीन म्हस्के, पंजाबराव कणखर, संदीप म्हळसणे, भागवत सपकाळ, शेषराव पाटील, बंडू जाधव, भारत म्हस्के, मदन वाघ, सोम खेडेकर, भिकाजी खेडेकर, एकनाथराव माळेकर, अक्षय वाघ, मधुकर वाघ, शिवा म्हस्के, रवी तेजनकर, परमेश्वर म्हळसणे, शिलाबाई सपकाळ, दुर्गाबाई थिगळे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी व महारार्ग विरोधी समिती सातत्याने पाठपुरावा करीत आहे. थाळीनादनंतर आता १ जुलैला लाक्षणिक उपोषण, आत्मक्लेश आंदोलन केले जाईल. शासनाने शेतकऱ्यांना मारक ठरणारा हा महामार्ग तातडीने रद्द करावा, तेव्हाच समिती व शेतकरी शांत बसतील.
- डॉ. सत्येंद्र भुसारी, महामार्ग विरोधी समिती सदस्य, चिखली, जि. बुलडाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Technology : शेतीमाल वाहतुकीसाठी दुचाकीची ट्रॉली

Goat Care: पावसाळ्यात शेळ्यांची 'अशी' काळजी घ्या

Turmeric Cultivation : हळद लागवडीचे व्यवस्थापन

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : राज्यातील लाडकी बहीण योजनेत मोठे बदल; अर्जासाठी मुदत वाढ

Maharashtra Assembly Session : 'स्मार्ट मीटर कुणासाठी अदानीच्या फायद्यासाठी', विरोधी पक्षांची आक्रमक भूमिका

SCROLL FOR NEXT