Protect Crops Agrowon
ॲग्रो विशेष

Protect Crops : वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण सध्याची प्राथमिकता : कुलगुरू गडाख

Protect Crops From Wild Animals : अकोला कृषी विद्यापीठाने तयार केलेल्या सौर ऊर्जाचलित संयंत्र तंत्रज्ञान प्रसाराच्या अनुषंगाने करार करण्यात आला.

Team Agrowon

Akola News : अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या वापरातून शाश्‍वत शेती आणि संपन्न शेतकरी संकल्पना कृतीत येत असताना हरिण, रानडुक्कर, रोही, आदी वन्य प्राण्यांपासून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

हाताशी आलेले पीक उद्ध्वस्त होऊन शेतकरी आर्थिक नुकसानाला सामोरे जातो. पर्यायाने वन्य प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करणे ही सध्याची प्राथमिकता बनली आहे, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.

यासाठी सौरऊर्जेवर चालणारे प्राणी प्रतिबंधक यंत्र विद्यापीठाच्या अपारंपरिक ऊर्जास्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभागाने विकसित केले असून, आज या संयंत्राच्या व्यावसायिक उत्पादन व वापरासाठी होत असलेला सामंजस्य करार फायदेशीर शेती व्यवसायातील एक महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्‍वास व्यक्त केला.

कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या अपारंपरिक ऊर्जास्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभागांतर्गत पंदेकृवि सौर ऊर्जाचलित प्राणी प्रतिबंधक संयंत्र व्यावसायिक उत्पादन व वापरासाठी तंत्रज्ञान विषयक सामंजस्य करार झाला. तसेच कमी किमतीच्या सौरप्रकाश सापळ्यांच्या विकासासाठी संशोधनात्मक करारही या वेळी झाला.

कृषी विद्यापीठ व यवतमाळ येथील मे. जी. टी. बायोसायन्स यांच्या हे करार झाले. या वेळी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, कृषी विद्यापीठाचे आयडॉल कृषी पदवीधर उद्योजक गजानन तोटे यांनीही मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक कृषी अभियांत्रिकी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र राजपूत यांनी केले, तर जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT