Exportable Mango Production Agrowon
ॲग्रो विशेष

Exportable Mango Production : निर्यातक्षम आंबा उत्पादन केले तरच समृद्धी शक्य

कन्नड तालुका पूर्वीपासूनच आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील आमरायामधील रायवळ आंब्यांचा संपूर्ण मराठवाड्यात दरारा होता.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : निर्यातक्षम आंबा उत्पादनातून (Exportable Mango Production) समृद्धी शक्य असल्याचे मत तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी व्यक्त केले.

महाकेसर आंबा बागायतदार (Mango Producer) संघातर्फे सोमवारी (ता. ९) कल्पेश जैन यांच्या नागद (ता. कन्नड) येथील आधुनिक अशा अतिघन केसर आंबा बागेत नुकताच आंबा लागवडीबाबत खास परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. कापसे बोलत होते.

डॉ. कापसे म्हणाले, की कन्नड तालुका हा परिसर पूर्वीपासूनच आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील आमरायामधील रायवळ आंब्यांचा संपूर्ण मराठवाड्यात दरारा होता. केव्हा येथील आंबा खायला मिळेल याची वाट छत्रपती संभाजीनगरमधील ग्राहक आतुरतेने वाट पाहायचे.

आता मात्र आमराया जवळपास नामशेष झाल्या आहेत. आता नवीन कल्पेश जैन यांच्यासारखे निर्यात योग्य केसर आंबा उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवूनच नवीन आधुनिक अशी लागवड करावी. त्यातूनच कन्नड तालुक्यास आंब्याबाबत गत वैभव प्राप्त करून द्यावे. असे ते म्हणाले.

या वेळी अध्यक्ष म्हणून महाकेसर आंबा बागायतदार संघाच्या अध्यक्ष नंदलाल काळे यांनी स्वतः च्या अत्याधुनिक अशा अतिघन लागवड आंबा बागेचे तंत्र विशद केले.

त्याच बरोबर महाकेसर तर्फे महाराष्ट्रामध्ये आधुनिक आंबा व्यवस्थापन तंत्रज्ञान विस्तार, बँडिंग करून विक्री प्रक्रिया तसेच मोठ्या प्रमाणात निर्यातीस चालना देण्यात येईल असे सांगितले.

महाकेसरचे संचालक अशोक सूर्यवंशी यांनी सुद्धा आपल्या मुखपाठ ता. सिल्लोड येथील अत्यंत खडकावर फुलविलेल्या आधुनिक अशा अतिघन लागवड आंबा बागेच महत्त्व सांगितले.

या वेळी महाकेसरचे कोशाध्यक्ष शिवाजीराव उगले यांनी मार्गदर्शनाबरोबरच शेतकऱ्यांना तीन हजार रुपये भरून महाकेसरचे आजीवन सदस्य होण्यासाठी आवाहन केले. कार्यक्रमास परीसरातील उच्च विद्याविभूषित श्री. छानवाल, विकास कापसे, श्री. दापके. श्री. नागदकर यांच्यासह परिसरातील बागायतदार उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ind-US Trade Conflict : शेतकरी हितासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार: पंतप्रधान मोदी यांचे डोनाल्ड ट्रम्पला उत्तर

Agriculture Development: शेतकरी हिताच्या सूचनांना मान्यता कधी?

Maharashtra Startup Policy 2025: Government Approves Initiative to Launch 50,000 Startups | Breaking NewsMaharashtra Startup Policy 2025: New Government Initiative to Launch 50,000 Startups | Breaking NewsMaharashtra Startup Policy: स्टार्ट अप : संधी अन् आव्हाने

Agriculture Success Story: नाशिकच्या मातीत घेतले ‘ॲव्होकॅडो’चे यशस्वी उत्पादन

Alephata Onion Rate: आळेफाटा येथील उपबाजारात कांदा प्रति क्विंटलला १६०० रुपये

SCROLL FOR NEXT