Water Management Agrowon
ॲग्रो विशेष

Water Management : माघवारीच्या कालावधीत पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करा

Pandharpur Water Supply : माघ एकादशी २० फेब्रुवारी रोजी असून, माघ वारी कालावधीत श्री विठ्ठल - रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. सद्यःस्थितीत पंढरपुरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे.

Team Agrowon

Pandharpur News : माघ एकादशी २० फेब्रुवारी रोजी असून, माघ वारी कालावधीत श्री विठ्ठल - रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. सद्यःस्थितीत पंढरपुरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे.

शहरात येणाऱ्या भाविकांना तसेच स्थानिक नागरिकांसाठी सुरळीत व स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा, यासाठी नगरपालिकेने १९.२० आणि २१ फेब्रुवारी रोजी दररोज पाणीपुरवठा सुरू ठेवण्याबाबत नियोजन करावे. तसेच पाण्याचा अपव्यय होणार नाही, यासाठीही आवश्यक काळजी घ्यावी, अशा सूचना प्रांताधिकारी बी. आर. माळी यांनी दिल्या.

माघवारी नियोजनाबाबत प्रांत कार्यालय येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मोहोळचे प्रांताधिकारी अजिंक्य घोडगे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, अपर तहसीलदार तुषार शिंदे, उपमुख्याधिकारी सुनील वाळुंजकर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेशकुमार सुडके, डॉ. प्रसन्न भातलवंडे, नायब तहसीलदार वैभव बुचके, उपअभियंता भीमाशंकर मेटकरी, बलभीम पावले यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

नगरपालिकेने नदीपात्रातील वाळवंटाची व घाटाची स्वच्छता करावी, मंदिर परिसरात अग्निशमन व्यवस्था उपलब्ध करावी. तात्पुरते शौचालयाचे उभारणीचे नियोजन करावे. येणाऱ्या भाविकांना व शहरवासीयांना वारी कालावधीत व वारी नंतर अस्वच्छतेमुळे त्रास होणार याची दक्षता घ्यावी. प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोडवरती कायम अतिक्रमण पथकांची उपलब्धता ठेवावी.

शहरातील अतिक्रमणे काढावीत. आरोग्य विभागाने वारी कालावधीत वैद्यकीय पथके कार्यरत ठेवावी त्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी, त्याचबरोबर पुरेसा आवश्यक औषधसाठा उपलब्ध करून ठेवावा. , अशा सूचनाही प्रांताधिकारी माळी यांनी या वेळी दिल्या.

मंदिर परिसरात सेल्फी पॉइंट नको

या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी भोसले म्हणाले, वाळवंट, पार्किंग, महाद्वारघाट तसेच ज्या ठिकाणी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते, अशा ठिकाणी भाविकांना वेळोवेळी आवश्यक सूचना देण्यासाठी लाउड स्पीकरची व्यवस्था करावी. मंदिर परिसरात सेल्फी पॉइंट करू नयेत जेणेकरून भाविक एका जागी थांबून गर्दी होणार नाही. आवश्यक ठिकाणी नदी पात्रात बॅरेकेटिंग करावे. आरोग्य विभागाने पत्राशेड व नदीपात्रात सर्व सुविधायुक्त आरोग्य कक्ष उभारावेत, अशी सूचनाही भोसले यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT