Sugar Production agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Production : पर्यायी साखर उत्पादनाला ‘डीएसटीए’कडून चालना

Alternative Sugar Production : देशाच्या साखर उद्योगात पर्यायी साखर उत्पादनाला चालना देण्याचा प्रयत्न दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्‍स असोसिएशनकडून (डीएसटीए) चालू आहे. त्यासाठी पुढील महिन्यात राष्ट्रीय पातळीवर चर्चा घडवून आणली जात आहे.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Sugar DSTA : पुणे ः देशाच्या साखर उद्योगात पर्यायी साखर उत्पादनाला चालना देण्याचा प्रयत्न दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्‍स असोसिएशनकडून (डीएसटीए) चालू आहे. त्यासाठी पुढील महिन्यात राष्ट्रीय पातळीवर चर्चा घडवून आणली जात आहे.

साखर उद्योगाने केवळ पांढऱ्या साखर उत्पादनावर भर न देता गंधकमुक्त साखर, कच्ची साखर, औषधीनिर्मिती (फार्मा शुगर) क्षेत्रातील साखर उत्पादनासाठी पुढे यायला हवे, असे ‘डीएसटीए’ला वाटते. त्यासाठी येत्या एक जून रोजी पुण्यातील डीएसटीएच्या मुख्यालयात राष्ट्रीय पातळीवरील चर्चा घेतले जात आहे. राष्ट्रीय साखर संस्थेचे (एनएसआय) माजी संचालक प्रा. नरेंद्र मोहन अगरवाल, डीएसटीएचे अध्यक्ष एस. बी. भड व गुजरात राज्य सहकारी साखर कारखाने संघाचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र ठक्कर या वेळी उपस्थित असतील.

या चर्चासत्रात डीएसटीएचे अध्यक्ष एस. एस. शिरगावकर, व्ही. एम. कुलकर्णी आपली मते मांडतील. गंधकमुक्त साखर निर्मिती, त्यातील संधी, आव्हाने आणि उपयुक्तता यावर एमआरएन ग्रुपचे एस. पंड्या, ए. पवार, नॅचरल शुगरचे यू. डी. दिवेकर, डिफटेक टेक्नॉलॉजिजचे संजय जैन, यू. एस. जैस्वाल, सुनील अवस्थी, संतोष कुमार, सुव्हिरॉन इक्विपमेंट्‍सचे चैतन्य जोशी, क्रेडो इम्पेक्सचे शंतनू कुलकर्णी यांच्याकडून मते मांडली जातील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Use of BioFertilizers: जमिनीचा कस वाढवणारे उपयुक्त सूक्ष्मजीव आणि त्यांचे फायदे

Silk Development: ‘रेशीम विभाग आपल्या दारी’ मोहीम राबवणार

Rural Development: नऊ गावांमध्ये विकासकामांचा दुष्काळ

Rabi Crop Management: शाश्‍वत रब्बी पीक उत्पादनासाठी मृद् व जलसंधारण

Onion Prices : कांद्याचे भाव पडल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू; आंध्र प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT