Egg Production : अंडी उत्पादनाला पशुसंवर्धन देणार चालना

राज्यात मागणीच्या तुलनेत अंडी उत्पादन कमी आहे, त्या पार्श्‍वभूमीवर राज्यात अंडी उत्पादनाला चालना मिळावी याकरिता खास योजना राबविण्याचा निर्णय पशुसंवर्धन विभागाकडून घेण्यात आला आहे.
Egg Production
Egg ProductionAgrowon

नागपूर ः राज्यात मागणीच्या तुलनेत अंडी उत्पादन (Egg Production) कमी आहे, त्या पार्श्‍वभूमीवर राज्यात अंडी उत्पादनाला चालना मिळावी याकरिता खास योजना राबविण्याचा निर्णय पशुसंवर्धन विभागाकडून (Department Of Animal Husbandry) घेण्यात आला आहे.

अनुदानावर लेअर कोंबड्यांचे (Layer Chicken) वितरण करण्याचे यात प्रस्तावित असून, हा प्रस्ताव मान्यतेतसाठी अर्थ खात्याकडे असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

Egg Production
Egg Diet : रोज अंडी खा, निरोगी राहा

‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’ अशा प्रकारच्या स्लोगनद्वारे अंडी खाण्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न नॅशनल एग्ज को-ऑर्डिनेशन कमिटीकडून सातत्याने करण्यात आला आहे.

राज्यात अशाप्रकारे जागृती झाल्याने पौष्टिक खाद्यान्न म्हणून अंड्याला पसंती वाढली. परिणामी, राज्यात दीड कोटी अंड्यांचे रोज उत्पादन होत असतानाही ते पुरेसे नसल्याचे समोर आले आहे.

Egg Production
Poultry Diseases : कोंबड्यांमध्ये या मार्गाने होतो रोगप्रसार

राज्याच्या दीड कोटीसोबतच हैदराबाद भागातून रोज सुमारे ७५ लाख अंडी राज्यात येतात. त्यानंतरही सुमारे एक कोटी अंड्यांचा तुटवडा राज्याला भासतो, अशी आकडेवारी सांगते. मागणी आणि पुरवठ्यातील ही दरी दूर करण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

मात्र राज्यात बहुतांश शेतकरी अंडी उत्पादनासाठी लेअर पक्ष्यांचे संगोपन करण्याऐवजी ब्रायलर पक्ष्याचे संगोपन करतात. शेतीपूरक व्यवसाय म्हणून ब्रॉयलरलाच पसंती असल्याने अंड्यांचे उत्पादनात वाढ अशक्‍य ठरत आहे.

ब्रॉयलरच्या तुलनेत लेअर पक्षी संगोपनात अडचणी येतात हे देखील एक कारण सांगितले जाते. कारणे काहीही असली तरी सध्या मात्र एक कोटी अंड्यांचा तुटवडा राज्यात असल्याने अंडी उत्पादन क्षेत्रात संधी आहेत हे देखील तितकेच खरे आहे.

त्यामुळेच पशुसंवर्धन विभागाने अंडी उत्पादनाला चालना मिळावी या उद्देशाने राज्यात अनुदानावर लेअर कोंबड्या पुरवठ्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता योजना प्रस्तावित असून, ती मान्यतेच्या अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जाते.

राज्यात अंडी उत्पादन क्षेत्रात संधी आहे. राज्यात एक कोटी अंड्यांचा तुटवडा रोज भासतो. त्यामुळेच अनुदानावर लेअर पक्षिपालनाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याकरिताची योजना प्रस्तावीत असून, ती शासन मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे.

- धनंजय परकान, उपायुक्‍त, पशुसंवर्धन विभाग, पुणे

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com