SMART Project Agrowon
ॲग्रो विशेष

SMART Project : ‘स्मार्ट’मधील ६० शेतकरी कंपन्यांचे प्रकल्प पूर्णत्वाकडे

Farmers Producers Company : राज्यात ‘स्मार्ट’ प्रकल्पातून मंजूर करण्यात आलेल्या ४०० पैकी ६० शेतकरी उत्पादक कंपन्यांची (एफपीसी) उपक्रम बांधणी पूर्णत्वाला आली आहे.

Team Agrowon

Pune News : राज्यात ‘स्मार्ट’ प्रकल्पातून मंजूर करण्यात आलेल्या ४०० पैकी ६० शेतकरी उत्पादक कंपन्यांची (एफपीसी) उपक्रम बांधणी पूर्णत्वाला आली आहे. जागतिक बॅंकेच्या मदतीतून उभारणी होत असलेल्या या कंपन्यांचे कामकाज लवकरच चालू होण्याची शक्यता आहे.

शेतीमालाचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळत नाही. कारण काढणीपश्चात अत्यावश्यक असलेली मूल्यसाखळी राज्यात नाही. त्यामुळे मूल्यसाखळी उभारण्याचा मुख्य उद्देश ठेवत राज्य शासनाने ‘स्मार्ट’ची (बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामपरिवर्तन प्रकल्प) पायाभरणी केली आहे. पाच लाखांपर्यंत उलाढाल असलेल्या नोंदणीकृत एफपीसींना नवे उपप्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट ‘स्मार्ट’ने ठेवले आहे.

‘स्मार्ट’चे प्रकल्प संचालक डॉ. हेमंत वसेकर यांनी सांगितले, की एफपीसींना उपप्रकल्प खर्चाच्या ६० टक्क्यांपर्यंत अनुदान राज्य शासनाकडून दिले जाते.

मात्र, त्यासाठी ३० टक्के कर्ज काढण्याची अट आहे. उर्वरित दहा टक्के स्वहिस्सा कंपनीने भरणे आवश्यक असते. ‘स्मार्ट’चे अनुदान राज्यभरातील एफपीसींना मिळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याकरीता लक्ष्यांक निश्चित केले होते. त्यातून काम करण्याची इच्छा असलेल्या एफपीसींचे प्रस्ताव मंजूर केले गेले. ४०० एफपीसींचे प्रस्ताव मंजूर केल्यानंतर अनेक कंपन्या त्यांचे उपप्रकल्प उभारण्यात गुंतलेल्या आहेत. मात्र, यातील ५० ते ६० कंपन्यांचे उपक्रम आता पूर्णत्वाला आलेले आहेत.

या कंपन्यांची उपप्रकल्प उभारणी अंतिम टप्प्यात असल्याने त्यांचे व्यवसाय लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. ‘स्मार्ट’मधून अनुदान मिळण्यासाठी प्रस्ताव मंजूर असूनही काम सुरू न करणाऱ्या कंपन्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्याचा चांगला परिणाम झाला असून जवळपास ३० टक्के कंपन्यांनी कामे करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या कंपन्यांनी पुढाकार घेतल्यामुळे त्यांना आता बॅंक कर्ज मिळण्याची शक्यता वाढली आहे.\

नव्या कंपन्यांना तूर्त थांबावे लागणार

‘स्मार्ट’मधून एफपीसींच्या उपक्रमाला अनुदान मिळविण्यासाठी पहिल्या टप्प्यात अनेक कंपन्या गाफिल राहिल्या. त्यांनी सहभागासाठी हालचाली केल्या नाहीत. मात्र अनेक कंपन्यांना आता सहभाग हवा आहे. परंतु सध्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे नव्या कंपन्यांना तूर्त थांबावे लागणार आहे. भविष्यात राज्य शासनाने कदाचित स्मार्टचा दुसरा टप्पा मंजूर केल्यास नव्या कंपन्यांना सहभागी करुन घेतले जाईल, असे ‘स्मार्ट’मधील सूत्रांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Anudan: नांदेडमध्ये कृषी यांत्रिकीकरणातून १२.७० कोटींचे अनुदान वितरित

Raju Shetti: बोगस आणि निकृष्ट खते, कीडनाशकांमुळे आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान, राजू शेट्टींकडून कारवाईची मागणी

Maharashtra Khat Satha: खरिपासाठी १.५० लाख टन युरिया, २५ हजार टन डीएपीचा संरक्षित साठा

Pani Tanchai Upay: पाणी टंचाईवर मात करत पेणच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Bhat Sheti in Maharashtra: सूर्या प्रकल्पामुळे उन्हाळी भातशेती बहरली

SCROLL FOR NEXT