Farmers hunger strike Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers hunger strike : अमरावतीत विविध मागण्यांसाठी वृद्ध शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

farmers hunger strike at Amravati : अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे उपोषण सुरू असून सोमवार (ता.११) उपोषणाचा पाचवा दिवस आहे. येथे उपोषणावर वयोवृद्ध शेतकरी बसले असून आतापर्यंत १४ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची प्रकृती बिघडली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : अमरावतीतील शेतकरी आणि शेतमजूरांनी आपल्या विविध मागण्यांसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण पुकारले आहे. येथे वयोवृद्ध प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि शेतमजुर उपोषणाला बसले असून सोमवार (ता.११) उपोषणाचा पाचवा दिवस आहे. तर आतापर्यंत १४ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची प्रकृती बिघडली असून आज देखील एका ७० वर्षीय वृद्धेची प्रकृती खालवली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन शेतकऱ्यांच्या मागण्यावर चालढकल करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 

अमरावती जिल्ह्यातील ५० पेक्षा अधिक वृद्ध शेतकरी हे विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या नेतृत्वात ७ मार्चपासून आमरण उपोषणावर बसले आहेत. तर या प्रकल्पग्रस्त शेतमजुरांनी प्रमाणपत्र, खरेदी केलेल्या जमिनीला वाढीव मोबदला, तसेच प्रकल्पग्रस्त शेतकरी कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी, अशा विविध मागण्यांसाठी सामूहिक उपोषणावर बसले आहेत. 

यादरम्यान आतापर्यंत १४ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची प्रकृती बिघडली असून आज देखील एका ७० वर्षीय वृद्धेची प्रकृती खालवली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या प्रकृती स्थिर आहे. 

दरम्यान यापूर्वीही या शेतकऱ्यांनी अमरावती ते नागपूर हिवाळी अधिवेशनावर लॉन्ग मार्च काढला होता. शिवाय त्यांनी अजित पवारांचा ताफाही अडवला होता. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रकल्पग्रस्तांना १५ जानेवारीला गोड बातमी देऊ असे आश्वासन दिलं होते. मात्र यावर अजूनही कोणताही निर्णय झालेला नसल्याने शेतकऱ्यांनी सामूहिक उपोषण पुकारले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

Sericulture Farming : पावसाने इतर पिकं गेली, तुती-रेशीम ठरलं आधार; ४ एकरांतून लाखोंचं उत्पन्न | Agrowon

Veterinary Staff Shortage: राधानगरीत रिक्त पदांमुळे जनावरांच्या उपचारात अडचणी

Rain Deficit Impact: पावसाने केळी लागवडीला ‘ब्रेक’

Akola Farmer Loan Waiver: अकोला जिल्ह्यातील ११ हजार ५० शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT