Jalgaon News: खानदेशात गुढीपाडवा किंवा मराठी नववर्षाला व अक्षय्य तृतीयेस आपल्या शेतीकामासाठी सालगडी नेमण्याची परंपरा आहे. अर्थात येत्या गुरूवारी (ता.१९) गावोगावी सालगडी नेमले जातील, त्यांचा मेहनताना काय, हेदेखील स्पष्ट होईल..अनेक शेतकरी गुढीपाडव्याला किंवा नवर्षाला आपल्या शेतात सालगड्याची नेमणूक करतात. तर काही शेतकरी अक्षय्य तृतीयेस सालगडी नेमतात. मोठे शेतकरी आपल्या सालगड्याचे अस्थायी निवासस्थान, वर्षभराचे धान्य आदी व्यवस्थाही करतात. ८० हजार ते ९० हजार रुपये प्रतिवर्ष किंवा १२ महिन्याच्या कामासाठी हा मेहनताना सध्या दिला जात आहे. परंतु यंदा हा मेहनताना किती, असेल हे स्पष्ट झालेले नाही..Farm Labour Shortage: भातकापणीसाठी मजूरटंचाई.अलीकडे पशुधनाची संख्या कमी झाली आहे. तसेच बैलजोडीकरवी फारशी आंतरमशागत, वाहतुकीची कामेही मोठे, मध्यम शेतकरी करीत नाहीत. यामुळे सालगड्यांची संख्याही शेतकऱ्यांनी कमी केली आहे. जेथे पूर्वी चार ते पाच सालगडी असायचे, तेथे आता दोनच सालगडी दिसतात.यातच ज्याला ट्रॅक्टर चालविता येते, औत हाकता येते, अशा सालगड्यांना शेतकरी पसंती देतात. कारण अनेकदा ट्रॅक्टरची कामे करावी लागतात, काही वेळेत आंतरमशागतीची कामेही पार पाडावी लागतात. यामुळे अष्टपैलू सालगडी मोठ्या शेतकऱ्यांना आता हवे आहेत..Labour Shortage: मजुरांच्या टंचाईमुळे तूर काढणीसाठी हार्वेस्टरकडे कल.आदिवासी बांधवांवर भिस्तखानदेशात आदिवासी बहुल क्षेत्रातील म्हणजेच सातपुडा पर्वत भागातील अनेक जण सालगडी म्हणून नियुक्त केले जातात. स्थानिक क्षेत्रात सालगडी मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यात अनेकदा फसवणूक होते, सालगडी पैसे घेवून रातोरात पसार होतात, .यामुळे प्रामाणिक, ओळखीच्या मंडळीकडून सालगड्यांची नियुक्ती करण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. त्यासंबंधी सालगड्यांची शोधाशोध सुरू झाली आहे. खानदेशात मध्य प्रदेशातील खरगोन, बडवानी जिल्ह्यातील मंडळी अधिक संख्येने सालगडी म्हणून काम करते. जळगावातील यावल, रावेर, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा भागात या मंडळीची संख्या अधिक आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.