Chief Executive Officer R. Vimala  Agrowon
ॲग्रो विशेष

World Consumer Rights Day : मागणी, गरज ओळखून उत्पादननिर्मिती करावी

Chief Executive Officer R. Vimala : ग्राहकांचा विश्‍वास संपादन करण्यासाठी ॲगमार्क, सेंद्रिय प्रमाणिकरण कार्यप्रणाली अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे,’’ असे मत राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी सांगितले.

Team Agrowon

Satara News : ‘‘ग्राहकांच्या मागणीनुसार दर्जेदार व गुणवत्तापूर्ण उत्पादनांचा पुरवठा करणे ही मुख्यत्वे आपली जबाबदारी आहे. ग्राहकांचा विश्‍वास संपादन करण्यासाठी ॲगमार्क, सेंद्रिय प्रमाणिकरण कार्यप्रणाली अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे,’’ असे मत राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी सांगितले.

महाबळेश्‍वर येथे राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या महाबळेश्‍वर येथील मध संचलनालयात जागतिक ग्राहक अधिकार दिवस कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, विपणन व निरीक्षण यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला.

महाबळेश्‍वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी महाबळेश्‍वर येथील मध उत्पादकांसाठी हे प्रदर्शन व चर्चासत्र उपयुक्त असल्याचे सांगितले. उप कृषी विपणन सल्लागार भावेश कुमार, वरिष्ठ विपणन अधिकारी राघवेंद्र मुरगोड, विजय पाटील आदी उपस्थित होते.

तूप, गूळ, हळद, मध, लोणची इत्यादींचे स्टॉल लावलेले होते. या स्टॉलला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मध, तूप तसेच अन्नपदार्थांतील भेसळ कशी ओळखावी, मधमाश्‍यांच्या वसाहती मधमाश्‍या हाताळण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: युरोपियन युनियन –मर्कोसूर कराराच्या विरोधात फ्रान्समधील शेतकऱ्यांचा एल्गार; ट्रॅक्टरसह पॅरिसमध्ये धडक

Shet Raste GR : शेत आणि पाणंद रस्ते योजनेच्या समितीत पाच प्रगतशील शेतकऱ्यांचा समावेश; राज्य सरकारचा निर्णय

Women Empowerment: ई-मार्केटद्वारे ग्रामीण उत्पादनांना बाजारपेठ

Tur Procurement: तुरीचा हमीभाव ८ हजार अन् विक्रीदर ६ हजार

Farmer Loan Waiver : हमीभाव, कर्जमुक्ती, बियाणे विधेयकाविरोधात फेब्रुवारीपासून देशव्यापी आंदोलन यात्रा; शेतकरी नेते डल्लेवाल यांची घोषणा

SCROLL FOR NEXT