Water Issue
Water IssueAgrowon

Water Issue : धुळ्यात टंचाईचे चटके वाढू लागले

Drought Condition : जळगाव जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. पारा सदतीसवर पोहोचलाय. दुष्काळी स्थितीत पाणीटंचाईच्या झळा गावपाड्यांबरोबर शेतीशिवारात जाणवू लागल्या आहेत.
Published on

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. पारा सदतीसवर पोहोचलाय. दुष्काळी स्थितीत पाणीटंचाईच्या झळा गावपाड्यांबरोबर शेतीशिवारात जाणवू लागल्या आहेत. वाढत्या उष्णतेचा फटका वृक्षांच्या रोपट्यासह वाढ अवस्थेत असलेल्या लहान वृक्षांना बसू लागला आहे.

महामार्गालगतच्या वृक्षांना जगविण्यासाठी संबंधित प्रशासनाने टॅंकरने पाणी घालण्यास सुरुवात केली आहे. धुळे जिल्ह्यात तीव्र दुष्काळी स्थिती आहे. बहुतांश भागात पाणीटंचाई तीव्र होत आहे. पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. लहान गावांमध्ये तीन दिवसांआड, तर मोठ्या गावांमध्ये पाच-सहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे.

Water Issue
Water shortage in Karnataka : कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये पाणीबाणी, १४ हजारपैकी ७ हजार बोअरवेल पडले बंद

आणखी पंधरा दिवसांनंतर भीषणता वाढणार आहे. संबंधित ग्रामपंचायतीने आतापासूनच उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दुष्काळी स्थितीत शेतशिवारासह जंगलामधील पशू-पक्ष्यांही पाण्याचा फटका बसत आहे. हे पशू-पक्षी पाण्यासाठी मानवी वस्तीकडे फिरकू लागले आहेत.

तर दुसरीकडे राज्य व राष्ट्रीय महामार्गालगतच्या वृक्षांना पाणी देण्यासाठी टॅंकर सुरू झाले आहेत. पर्यावरण संतुलनासाठी झाडे लावणे आणि जगविणे किती महत्त्वाचे आहे. पाणीटंचाई दूर करताना झाडेही जगविण्याचा प्रयत्न होत केले जात असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Water Issue
Water Scarcity : नगर जिल्ह्यात ३८ गावांसह २१० वाड्यावस्त्या तहानल्या

जिल्ह्यात सातपुड्यातही टंचाई आहे. तसेच अन्य भागातही ही समस्या वाढली आहे. सुमारे १४ गावांत टंचाई अधिक आहे. साक्री, शिंदखेडा व धुळे तालुक्यात टंचाईग्रस्त गावे अधिक आहेत. अनेक गावांत पाणीकपात करावी लागली आहे. कारण जलस्रोत कमी झाले आहेत.

जलस्रोत कमी झाल्याने पुढेही टंचाई किंवा कपातीची समस्या वाढेल. काही मोठ्या गावांत दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे खासगी टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून घ्यावे लागत आहे. सातपुडा पर्वतात पाऊस बरा होता. परंतु सातपुड्यात पावसाचे पाणी साठविण्याची व्यवस्था नाही. पाणी वाहून जाते. यामुळेही सातपुड्यात पाऊस असूनही टंचाई आहे. धुळ्यात २० टक्के एवढी पावसाची तूट होती.

एकूण ५६५ मिलिमीटर धुळ्यात पडतो. परंतु जून व ऑगस्टमध्ये पावसाचा मोठा खंड होता. यामुळे पीकहानीदेखील झाली. पाणीपातळीत झपाट्याने घट होत असून, विहिरींचे स्रोत शिवारात कमी झाल्याने अडचण वाढली आहे. यामुळे शेतशिवार पुढे उजाड होईल, अशीही स्थिती आहे. शिंदखेडा, धुळे व साक्रीत शिवारात टंचाई अधिक आहे.

प्रकल्पांत जलसाठा कमी

जिल्ह्यात धुळ्यातील अनेर, साक्रीतील पांझरा हेच मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले होते. अमरावती, सोनवद, मालनगाव, बुराई या प्रकल्पांसह लहान-मोठ्या तलावांतही जलसाठा अल्प होता. याचाही फटका शेतीला व गावांतील पाणीपुरवठा वेळापत्रकास बसला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com