Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर येथील पैठण रोडवरील कृषी तंत्र महाविद्यालयाच्या प्रांगणात शुक्रवारपासून (ता. ६) दोनदिवसीय कृषीधारा कृषी महोत्सवाला प्रतिसादच अत्यंत अत्यल्पच राहिला. शनिवारी (ता. ७) रात्री महोत्सवाचा समारोप होणार होता. .कृषी तंत्र महाविद्यालयाच्या प्रांगणात शुक्रवारपासून दोनदिवसीय कृषीधारा कृषी महोत्सवाचे आयोजन कृषी विभागाकडून करण्यात आले होते. यामध्ये कृषी प्रदर्शन, परिसंवाद, चर्चासत्र, धान्य महोत्सव, पौष्टिक तृणधान्य प्रदर्शन, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, आधुनिक कृषी अवजारे प्रदर्शन, विविध विभागाची माहिती देणारे स्टॉल या कृषी महोत्सवात असतील असे स्पष्ट करण्यात आले होते. .Agriculture Festival: अहिल्यानगरमध्ये शेतकरी, महिलांसाठी कृषिपर्व महोत्सव.प्रत्यक्षात धान्याचे स्टॉल एखादे वगळता नसल्याची स्थिती होती. इतरही विषयाची स्टॉल नगण्यच होते. (ता. ६) शुक्रवारी उद्घाटनानंतर प्रदर्शन स्थळांकडे ग्राहक फिरकलेच नाही. सायंकाळपर्यंत ही स्थिती कायम होती. सायंकाळी सहा नंतर काही ग्राहक आले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ग्राहक येथील अशी आशा होती. .Agriculture Festival: कृषी महोत्सवासाठी परिपूर्ण नियोजन करा.परंतु दुसऱ्या दिवशीही दुपारपर्यंत ग्राहकांची वानवाच राहिली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी शनिवारी काही पहिल्या दिवशी सहभागी झालेल्या काही स्टॉलधारकांनी येणे टाळले. तर काही स्टॉलधारकांनी दुपारनंतर प्रदर्शनातून परत जाणे पसंत केले. वाढता उन्हाचा चटका एक कारण असले तरी ग्राहकांपर्यंत धान्य महोत्सव कृषी महोत्सव आयोजन पोहोचण्याला विलंब झाला का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे..शनिवारी ही दुपारी चार वाजेपर्यंत एखादे दुसरे ग्राहक वगळता आयोजन स्थळी ग्राहक फिरकतच नसल्याची स्थिती होती. शनिवारी रात्री आठ नऊ वाजेपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे सायंकाळनंतर काही ग्राहक येतील अशी, आशा काही स्टॉलधारकांनी व्यक्त केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.