Turmeric Plant Agrowon
ॲग्रो विशेष

Turmeric Seed : संशोधन केंद्रातर्फे हळदीच्या रोपांची निर्मिती

Turmeric Plant Production : वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने यंदा प्रथम हळदीच्या रोपांची निर्मिती केली जात आहे.

माणिक रासवे

Hingoli News : वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने यंदा प्रथम हळदीच्या रोपांची निर्मिती केली जात आहे. लागवडीयोग्य रोपांची शेतकऱ्यांना विक्री केली जात आहे.

रोपांद्वारे लागवड केल्यास हळद पिकाचा कालावधी एक ते दीड महिना कमी होईल. वाणांची शुद्धता टिकून राहील. यंदा हळद संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर हळदीच्या ४४ वाणांची ८ एकरांवर लागवड करण्यात आली आहे, अशी माहिती तंत्र अधिकारी रमेश देशमुख यांनी दिली.

यावर्षी हळद पीक लागवडीकडे वाढणारा शेतकऱ्यांचा कल आहे. हिंगोलीसह शेजारील जिल्ह्यात हळद लागवड क्षेत्रात वाढ अपेक्षित आहे. यावर्षी हळद बेण्याचे भाव जास्त आहेत. तसेच पुरेशा प्रमाणात बेण्याचीही उपलब्धता नाही.

त्यामुळे यंदा हळद लागवड करण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांसाठी केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, व्यवस्थापकीय संचालक साहेबराव दिवेकर यांच्या मार्गदर्शनात यंदा हळद संशोधन केंद्राच्या वतीने हळदीची रोपे तयार करून विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आहेत.

या भागातील प्रचलित हळद सेलम या वाणाचे शुद्ध व दर्जेदार बेण्यापासून प्रो ट्रे मध्ये हळदीची रोपे तयार करण्यात आली आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर किंवा खरेदीसाठी पूर्व नोंदणी केलेले शेतकऱ्यांना ही रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. रोपे पद्धतीने लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यासाठी संशोधन केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत.

रोपांची शास्त्रशुद्ध पद्धतीने लागवड करून चांगले उत्पादन मिळण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील उद्यान विद्यावेत्ता डॉ. प्रफुल्ल माळी यांचे ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.या भागात रोपांपासून हळदीची लागवड होत नाही.

रोपांद्वारे लागवडीतून मिळणारी उत्पादकता व इतर अडचणी समजून घेण्यासाठी तसेच भविष्यात या तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर लागवड करता येईल. उत्पादन चांगले मिळेल. वसमत येथील संशोधन केंद्राच्या वतीने २ लाख रोपे तयार करुन शेतकऱ्यांना माफक किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

दर्जेदार बेणे उत्पादन.....

हिंगोली, परभणी, नांदेड आणि शेजारील जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना शुद्ध बेणे उपलब्ध व्हावे यासाठी गतवर्षी प्रक्षेत्रावर पाच एकरांवर देशातील विविध भागातील ३२ हळदीच्या वाणांची लागवड करण्यात आली होती.

वसमत भागात सेलम या जातीची लागवड मोठ्या प्रमाणावर होत असल्याने या वाणाचा बेणे उत्पादन कार्यक्रम प्रक्षेत्रावर घेण्यात आला. पहिल्याच वर्षी तब्बल २०० क्विंटलवर बेणे उत्पादित केले. कसबे डिग्रस येथील संशोधन केंद्रातून आणलेल्या फुले स्वरुपा या वाणांच्या पैदासकार बेण्यापासून ६० ते ६२ क्विंटल या पायाभूत बेणे उत्पादन मिळाले, असे देशमुख म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT