Sugarcane  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Production : आधुनिक तंत्रज्ञान वापरातून उसाचे एकरी शंभर टन उत्पादन शक्य

Sugar Farming : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उसाचे एकरी शंभर टनांपर्यंतचे उत्पादन सहज घेता येते.

Team Agrowon

Nashik News : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उसाचे एकरी शंभर टनांपर्यंतचे उत्पादन सहज घेता येते. द्वारकाधीश साखर कारखानानिर्मित सेंद्रिय खताचा वापरासह त्याचा फायदा आहे, असे प्रतिपादन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथील ऊस विशेषज्ञ डॉ. रमेश हापसे यांनी केले.

निफाड येथे शेवरे (ता. बागलाण) येथील द्वारकाधीश साखर कारखान्याच्या वतीने ऊस पीक परिसंवाद प्रसंगी ऊसउत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. हापसे बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत परिसंवादाचे अध्यक्ष होते.

डॉ. हापसे म्हणाले, की उसाचे उत्पादन वाढवण्यासाठी जमिनीची सुपीकता, लागवड पद्धत, बेणे वापर, पाणी, खत नियोजन, कीड-रोग नियंत्रण या पंचसूत्रीचा अवलंब करून एकरी शंभर टनांपर्यंत उसाचे उत्पादन सहज घेता येते.

तसेच जमिनीचे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर केल्यास उसाचे उत्पादन वाढते. या वेळी ऊस उत्पादकांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन डॉ. हापसे यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात सावंत यांनी सांगितले, की शेतकरी प्रयोगशील असून जमिनीतील सेंद्रिय कर्बाची पातळी वाढविण्यासाठी कारखान्यामार्फत ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर उधारीने मागणीनुसार सेंद्रिय खताचा पुरवठा उत्पादकांना केला जाईल. तसेच ऊस उत्पादकांना उसाचे उत्पादन वाढविण्यासाठी आवश्यक ती मदत कारखान्यातर्फे केली जाईल, असे आश्वास्त केले.

अनिल कुंदे यांनी सांगितले, की गेल्या पंधरा वर्षांत उसाचे उत्पन्न वाढविण्यासाठी कोणत्याही कारखान्याने असे कार्यक्रम आयोजित केले नाहीत. द्वारकाधीश साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करीत असल्याने कारखान्याचे अध्यक्ष सावंत यांचे शेतकऱ्यांनी आभार व्यक्त केले.

या वेळी राजेंद्र सोनवणे, संजय सांगळे, खंडू बोडके, राजेंद्र सोमवंशी, राजेंद्र सानप, संजय आढाव, लक्ष्मण लोखंडे, गोरख वाघ, जयराम दाते, तानाजी पुरकर, उद्धव गिते, सुनील शिंदे, राजाराम वाघ, नामदेव सानप, प्रवीण राजोळे, विजय सोमवंशी, पंकज सोमवंशी यांच्यासह कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव भालेराव, जनरल मॅनेजर बाळासाहेब करपे, विजय पगार, सतीश सोनवणे, विकास पाटील, सुरेश निकम, विलास जगताप, सर्जेराव गांगुर्डे, हेमंत खैरणार, राजीव सोनवणे, राजेंद्र सोमवंशी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT