Chana  Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Procurement : मोबाईल केंद्राद्वारे हरभऱ्याची शेतकऱ्यांच्या दारावर खरेदी

‘नोबेल पल्स फूड ग्रोअर्स को-ऑपरेटीव्ह सोसायटी’ने हरभरा विपणनाच्या क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकत थेट शेतकऱ्यांच्या दारावरच खरेदीचा अभिनव पॅटर्न राबविला आहे.

Team Agrowon

Amravati News : ‘नोबेल पल्स फूड ग्रोअर्स को-ऑपरेटीव्ह सोसायटी’ने हरभरा विपणनाच्या क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकत थेट शेतकऱ्यांच्या दारावरच खरेदीचा अभिनव पॅटर्न राबविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा बराच भार हलका झाला आहे.

‘नाफेड’च्या केंद्रांवर शेतकऱ्यांना तासनतास आपला क्रमांक येईपर्यंत ताटकळत राहावे लागते. यातच त्यांचा वेळ, श्रम आणि पैसाही खर्ची होतो. ही बाब गांभीर्याने घेत ‘नोबेल पल्स फूड ग्रोअर्स को-ऑपरेटीव्ह सोसायटी’ने थेट शेतकऱ्यांच्या दारावर जात हरभरा खरेदीचा निर्णय घेतला आहे.

दर्यापूर तालुक्‍यात सात केंद्रांतून हरभऱ्याची खरेदी होत आहे. त्यात धामोडी येथील नोबेल सोसायटीचाही समावेश आहे.

रामागढ, नरदोडा, हिंगणी, शिवर, पिंपळद, वरुड, दर्यापूर या गावांमध्ये २३०० क्‍विंटल हरभऱ्याची खरेदी केला आहे. संस्थेचे संजय आसरे, संदीप लाजूरकर यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जात आहे.

शेतकऱ्यांचे कष्ट कमी करण्याच्या उद्देशाने थेट त्यांच्या दारावरूनच खरेदीचा निर्णय घेतला. याला शेतकऱ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजवर सुमारे २३०० क्‍विंटल हरभरा खरेदी केला.
अरविंद नळकाडे, अध्यक्ष, नोबेल पल्स फूड ग्रोअर्स को-ऑपरेटीव्ह सोसायटी, धामोडी.
हमीभाव केंद्रांवर नोंदणी करून हरभरा विक्री केली असता त्यात वेळ, श्रम आणि पैसाही खर्च होतो. मात्र या संस्थेने थेट दारावर येत हरभरा खरेदी केला. हा सुखद अनुभव होता.
प्रल्हादराव काळे, शेतकरी, दर्यापूर, अमरावती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chandrapur Water Crisis: वाढत्या उष्णतेने चंद्रपूर होरपळले, जलसाठा ४५ टक्क्यांवर

Nanaji Deshmukh Project: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात ग्रामस्तरावरच अर्ज रखडले

Fertilizer Dealer Action: खत लिंकिंग केल्यास संबंधित विक्रेत्यावर होणार कठोर कारवाई: कृषी अधिकारी विवेक कुंभार

Banana Crop Damage: वादळामुळे केळीचे पीक जमीनदोस्त

Soybean Seeds Availability: खरिपासाठी घरगुती सोयाबीन बियाण्याचा मोठा साठा उपलब्ध

SCROLL FOR NEXT