Paddy Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Procurement : भात खरेदी-विक्री प्रक्रिया होणार सुलभ

Paddy Crop : शेतकऱ्यांकडून आदिवासी विकास मंडळ भात खरेदी करते; मात्र खरेदीची प्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने शेतकऱ्यांना त्रास होत असल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या. त्यामुळे आमदार राजेश पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी या विषयावर चर्चा केली.

Team Agrowon

Palghar News : शेतकऱ्यांकडून आदिवासी विकास मंडळ भात खरेदी करते; मात्र खरेदीची प्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने शेतकऱ्यांना त्रास होत असल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या. त्यामुळे आमदार राजेश पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी या विषयावर चर्चा केली.

तसेच शेतकऱ्यांची खरेदी प्रक्रिया सुलभ करण्याचे आदेश जिल्हाधिकारी गोविंद बोडके आणि संबंधित विभागाला तात्काळ दिले..भात खरेदी केंद्रावर अपुरा कर्मचारी वर्ग असल्यामुळे शेतकऱ्यांना हा त्रास सहन करावा लागत आहे.

२०२२ ते २३ या वर्षातील खरीप हंगामात दिलेल्या भाताचा बोनस आजतागायत शेतकऱ्यांना दिलेला नाही. तो लवकरात लवकर द्यावा, अशी मागणी पाटील यांनी या वेळी केली.त्याचप्रमाणे भात खरेदी- विक्रीची मर्यादा ३८ क्विंटलवरून २४ क्विंटल करण्यात आल्याने ती वाढवून देण्यात यावी.

७/१२ वर ऑनलाईन ई-पीक पाहणी नोंद‌वताना भात महामंडळाच्या केंद्रावर देण्याबाबत आगाऊ नोंदणी केलेली असतानादेखील पुन्हा महामंडळाच्या कार्यालयात नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. याने शेतकऱ्यांचा वेळ व पैसा वाया जात आहे. त्यामुळे ही अट शिथिल करावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असेही पाटील यांनी बैठकीत सांगितले.बारदान शेतकऱ्यांना देण्याच्या सूचना केल्या. तसेच याची अंमलबजावणीचे आदेश जिल्हाधिकारी बोडके यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT