Paddy Market : खर्डीत भाताची कवडीमोल दराने विक्री

Paddy Rate : सरकारी कमी भाव व खर्डीत भात खरेदी केंद्र सुरू न केल्याने परिसरातील शेतकरी खासगी व्यापाऱ्याच्या कचाट्यात सापडला आहेत.
Paddy Crop
Paddy CropAgrowon

Latest Agriculture News : सरकारी कमी भाव व खर्डीत भात खरेदी केंद्र सुरू न केल्याने परिसरातील शेतकरी खासगी व्यापाऱ्याच्या कचाट्यात सापडला आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह व मुलांच्या शिक्षणासाठी मेहनतीने कमावलेला व निसर्गाच्या कोपातून वाचलेले भात खासगी व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने विकावे लागत असल्याने शेतकऱ्यांना यावर्षी चांगला भात पिकूनही मेहनतीचे फळ मिलत नसल्याने व शासनाने खर्डी व उबरखांड या ठिकाणी भात खरेदी केंद्र सुरू न केल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे.

आदिवासी विकास महामंडळाने खर्डी परिसरात खरेदी केंद्र सुरू न केल्याने शेतकरी शासनाच्या विरोधात संताप व्यक्त करीत आहेत. शंभर पाडे, ६० गावे व दहा ग्रामपंचायतींनी खर्डी परिसर जोडलेला असून येथे शेतकरी भाताचे एकमेव पीक घेतात. लहरी पावसामुळे कधी ओला; तर कधी सुका दुष्काळाचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो.

Paddy Crop
Paddy Plantation : गोंदिया जिल्ह्यात ४३ हजार हेक्‍टरवर उन्हाळी धान

भाताचे कोठार समजल्या जाणाऱ्या खर्डी विभागात खासगी व्यापाऱ्यांची चंगळ सुरू असून ते शेतकऱ्यांच्या गरजेचा फायदा घेऊन कलडीमोलाने भात खरेदी करत आहेत. त्यानंतर आपली गोदामे भरून नंतर आदिवासी विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून आपला भात शासकीय दरानुसार ७/१२ची अफरातफर करून विकत आहेत.

त्यामुळे चरितार्थ आणि उत्पन्नाचे साधन असणारी भातशेती शेतकऱ्यांना नकोशी झाली असल्याचे शेतकरी दीपक घरत यांनी सांगितले. दरवर्षी वाढलेली मजुरी, खते, बी-बियाणांचे वाढलेले दर यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अनेक नैसर्गिक संकटातून वाचलेला भात कमी भावाने खासगी व्यापारी घेत असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.

प्रक्रिया उद्योगांचा अभाव

खर्डी परिसरात भातावर प्रक्रिया उद्योगांचा अभाव असल्याने भात जसेच्या तसे विकले जाते. लाह्या, तांदूळ व पोहे यांसारखे सहकारी उत्पादक उद्योग नसल्याने भाताच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना वेठीस धरले जाते. तसेच इथे सार्वजनिक बांधकाम विभागाची गोदामे उपलब्ध असूनही आदिवासी महामंडळ स्वतः भात खरेदी केंद्र का सुरू करीत नाही, याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी डोळेझाक करीत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

Paddy Crop
Paddy Harvesting : रब्बीच्या तोंडावर भात काढणीला वेग

प्रतिक्विंटल तीन हजार रुपये भाव देण्याची मागणी

या वर्षी भाताला आदिवासी विकास महामंडळाने क्विंटलला दोन हजार १८३ रुपये दर जाहीर केला आहे. हा भाव योग्य नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत असून भाताला तीन हजार रुपयांचा भाव मिळावा, अशी मागणी करीत आहेत.

खर्डीत खरेदी केंद्र सुरू न केल्याने या विभागातील टेंभा, दहिगाव, जरंडी, दळखण, कसारा, अजनुप येथून भातसा नगर हे खरेदी केंद्र २० किमी असल्याने तिथे पोहचण्यासाठी शेतकऱ्यांना नाहक प्रवास खर्च, वेळ व मेहनत करावी लागणार आहे. जवळ खरेदी केंद्र नसल्यामुळे गरजेमुळे खाजगी व्यापाऱ्यांना एक हजार ते १२०० रुपये प्रतिक्विंटलने भात विक्री करताना डोळ्यात पाणी येत असल्याचे स्थानिक शेतकरी गणपत धसाडे यांनी सांगितले.

खर्डी परिसरात भात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पण, शासन येथील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने येथे खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. त्यामुळे गरजू शेतकऱ्यांकडून खाजगी व्यापारी कवडीमोल भावात भात खरेदी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. यासाठी या विभागात भातप्रक्रिया उद्योग सुरू करावा. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल.
- चंद्रकांत घरत, स्थानिक शेतकरी
खर्डी विभागातील भात खरेदी केंद्रात अफरातफर केल्याने केंद्र रद्द करण्यात आले आहे. येथील विभागातील शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्याला भात न विकता भातसानगर येथील खरेदी केंद्रावर आपले भात विक्रीसाठी आणावे. लवकरच भात खरेदी केंद्र सुरू करण्यात येईल.
- नीलेश राजपूत, उपव्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ, शहापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com