Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : नुकसानग्रस्तांच्या मदतीची प्रक्रिया आणि जबाबदारी निश्चित करावी

Team Agrowon

Parbhani News : नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना द्यावयाच्या मदतीची प्रक्रिया व जबाबदारी नियमानुसार निश्चित करावी,‌ अशी मागणी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या हिंगोली तालुका शाखेतर्फे कृषी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे दर वर्षी शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत देण्याबाबतची प्रक्रिया व जबाबदारी ही शासनाने वेळोवेळी निश्चित केलेली आहे.

सध्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तलाठी संघटनेकडून शासनास निवेदन देऊन त्यांच्याकडे नियमानुसार असलेले शेतपिकाच्या नुकसान बाधितांना द्यावयाचे अनुदान वाटपाचे काम नाकारले असून हे काम कृषी विभागाने व पर्यायाने कृषी सहायक यांनी करावे, असे तलाठी संघटनेचे म्हणणे आहे.

हे काम महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील तलाठी यांनी करावे, असे निर्देश दिलेले आहेत. काही जिल्हा, तालुक्यांमध्ये तहसीलदार यांच्याकडून सर्वेक्षण व पंचनामे करून अहवाल तयार करणे त्यांच्या सॉफ्ट व हार्ड कॉपी तयार करून अहवाल सादर करणे व नुकसानग्रस्तांच्या याद्या तयार करणे यासाठी कृषी सहायकांवर दबाव टाकण्यात येत आहे.

नुकसान बाधितांच्या याद्या तयार करताना लागणारी माहिती ज्यामध्ये खातेदारांची नावे, आठ-अ क्षेत्र, सर्वे नंबर, वेळोवेळी झालेले फेरफार, जमिनीचा प्रकार, पात्र-अपात्र खातेदार, जमीन कब्जेदार यावावतची अचूक व दरवर्षी बदल होणारी माहिती केवळ तलाठी यांच्याकडेच उपलब्ध असते.

नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित क्षेत्रांची पाहणी माहिती देण्यासाठी कृषी विभाग नेहमीच पुढे असतो. परंतु अहवाल तयार करून सादर करणे, याद्या तयार करणे व अनुदानवाटप याची जबाबदारी तलाठी यांना दिलेली असताना कृषी सहायकांना तक्रारीला सामोरे जावे लागत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

Banana Rate : केळीला ३२०० रुपये कमाल दर

Potato Production : शिरदाळ्यात बटाटा उत्पादनात घट

pH Level of Water : कीडनाशकांच्या लेबलवर नमूद राहील पाण्याचा सामू

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

SCROLL FOR NEXT