Chhatrapati Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Chhatrapati Sugar Factory: छत्रपती साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज जाचक

Prithviraj Jachak: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकतर्फी सत्ता आणलेल्या कारखान्याच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्षपदी कैलास गावडे यांची बिनविरोध निवड झाली.

Team Agrowon

Pune News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकतर्फी सत्ता आणलेल्या कारखान्याच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्षपदी कैलास गावडे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक प्रचारात अजित पवार यांनी जाचक यांना अध्यक्ष करण्याचे आश्‍वासन दिले होते. 

साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखालील जय भवानीमाता पॅनेलने सर्व २१ जागांवर विजय मिळवला होता. अध्यक्षपदासाठी जाचक व उपाध्यक्षपदासाठी गावडे यांचे बुधवारी (ता. २८) एकमेव अर्ज दाखल झाले. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी जाचक व गावडे यांची नावे जाहीर केली.

तत्पूर्वी कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाशी अजित पवार, दत्तात्रेय भरणे यांनी चर्चा केली. निवडीप्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक जाधव, बारामतीचे सहायक निबंधक प्रमोद दुरगुडे, इंदापूरचे सहायक निबंधक गायकवाड, कामगार नेते युवराज रणवरे आदी उपस्थित होते.

पृथ्वीराज जाचक यांची अध्यक्षपदाची हॅट्‌ट्रिक

पृथ्वीराज जाचक हे आज तिसऱ्यांदा कारखान्याचे अध्यक्ष झाले. जाचक हे १९९५ मध्ये पहिल्यांदा अध्यक्ष झाले होते. १९९८ मध्ये दुसऱ्यांदा; तर २०२५ मध्ये त्यांना तिसऱ्यांदा अध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला.

वर्गमित्र झाले अध्यक्ष व उपाध्यक्ष

कारखान्याचे अध्यक्ष जाचक व उपाध्यक्ष गावडे हे दोघे वर्गमित्र आहेत. दोघांनी पुण्यात एकत्र महाविद्यालयामध्ये चार वर्षे शेतीविषयक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतले असून आता दोघे कारखान्याचा कारभारही पाहणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Alert Maharashtra : कोकण, घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’

Sharad Pawar : सहकार चळवळीला सुरुंग

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात संततधार

Fertilizer Mismanagement : कृषी सेवा केंद्रातील खत साठ्यात तफावत

Heavy Rain Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात पावसाचा हाहाकार

SCROLL FOR NEXT