Paddy Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Harvesting : खेडच्या पश्‍चिम पट्ट्यात भात पिकाच्या कापणीसाठी आधुनिक तंत्राला प्राधान्य

Paddy Farming : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने भात पिकाची कापणी करण्यास शेतकरी प्राधान्य देत आहेत.

Team Agrowon

Khed News : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने भात पिकाची कापणी करण्यास शेतकरी प्राधान्य देत आहेत. मजूर टंचाईवर चांगला पर्याय असल्याने शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे. यामुळे मिनी हार्वेस्टर (भात कापणी यंत्र) शेतकऱ्यांना वरदान ठरते आहे.

पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत शेतीतून शाश्‍वत उत्पन्न घेण्यासाठी ठोस प्रयत्न होत असताना शेतमजूर टंचाई हा प्रश्‍न गेली काही वर्षांपासून सातत्याने भेडसावतो आहे. शेतमजूर उपलब्ध होत नसल्याने अनेक शेतकरी आपली शेतजमीन दुसऱ्याकडे कसायला (अर्धेलीने) देणे किंवा पडीक ठेवणे हा पर्याय अवलंबतो.

खेडच्या पश्चिम पट्ट्यातील भिवेगाव, भोरगिरी, टेकावडे, शिरगाव, डेहणे या गावांतील शेतकऱ्यांनी यंत्राच्या साहाय्याने भात कापणी करण्यास प्राधान्य दिले आहे, असे भात उत्पादक शेतकरी भरत गोपाळे, बाळासाहेब वनघरे, दत्ता खाडे, प्रकाश सोनवणे, विष्णू वनघरे, अनिता लोहकरे आदींनी सांगितले.

मजूर टंचाईवर मात

चालू वर्षी परतीचा पाऊस लांबल्यामुळे सर्व शेतकऱ्यांची भात काढणी एकाच वेळी आली असल्याने भाताची कामे करण्यासाठी मजुरांची टंचाई निर्माण झाली. यावर हार्वेस्टर उपयुक्त ठरत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Price: खानदेशात कापसाला फटका

Cotton Registration: कापूस विक्रीसाठी स्व-नोंदणी मुदत ३१ पर्यंत

Agriculture College: डॉ. देशमुख यांच्या जन्मगावी कृषी महाविद्यालयाला अखेर मंजुरी

Seed Conservation: देशी बियाण्यांचा जागर करत दिवाळीला पद्मश्री राहीबाई पोपेरेंकडून पूजन

Jaggery Rate: पाडव्याच्या मुहूर्तावर सौद्यात गुळाला ४५०० रुपये दर

SCROLL FOR NEXT