Budget 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Budget 2024 : अर्थसंकल्पीय अधिवेशनास आजपासून सुरूवात, 'हा क्षण स्त्री शक्तीच्या पर्वाची सुरुवात असेल'

PM Modi ON Budget Session 2024 : यंदा होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. त्यानंतर अधिवेशनास सुरूवात होईल.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : देशाच्या २०२४ सालच्या अर्थसंकल्पाकडे अख्या जनतेचे लक्ष लागले आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज बुधवारपासून (३१ रोजी) सुरूवात होत आहे. या सत्राची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन्ही दोन्ही सभागृहांना संबोधित केल्यानंतर होणार आहे. तर मोदी सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असून यानंतर देशात लोकसभा निवडणूका होणार आहे. यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून देशाचा अंतरिम अर्थसंकल्प गुरूवारी (१ फेब्रुवारी) मांडला जाणार आहे. तर पूर्ण अर्थसंकल्प हा लोकसभेच्या निवडणूका पार पडल्यानंतर येणाऱ्या नव्या सरकारकडून मांडला जाईल. 

विशेष मुर्मू यांचे अभिभाषण हे संसदेच्या केंद्रीय कक्षात होणार नसून ते नवीन संसदेच्या सभागृहात होईल. तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे राष्ट्रपती मुर्मू पहिल्यांदाच नवीन संसद भवनात जाणार आहेत. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "या नवीन संसद भवनात झालेल्या पहिल्या अधिवेशनाच्या शेवटी, या संसदेने एक अतिशय सन्मानजनक निर्णय घेतले आहेत. ज्यात नारी शक्ती वंदन कायद्याचा समावेश आहे. तर देशाने कर्तव्य पथावर महिला शक्तीचे सामर्थ्य आणि शौर्य पाहिले आहे. दरम्यान आज अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मार्गदर्शन मिळणार आह.

तर उद्या अर्थमंत्री सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. हा क्षण स्त्री शक्तीच्या पर्वाची सुरुवात असेल. तसेच मला आशा आहे की गेल्या १० वर्षात प्रत्येकाने संसदेत चांगले काम केले. पण काहींनी लोकशाही मूल्यांना फाटा देत गोंधळ घातला. अशा सर्व खासदारांनी आत्मपरीक्षण करायला हवे की, १० वर्षात त्यांनी काय केलं असा टोला मोदींनी काँग्रेसला लगावला आहे. तसेच, त्यांनी याबाबत आपल्या मतदार संघातील १०० एक लोकांना विचारा. त्यांचे नाव देखील कोणाला माहीत नसेल. पण ज्यांनी सभागृहात चांगल्या विचारांनी काम केले त्यांचे नाव नक्कीच लोकांच्या लक्षात असेल. 

पुढे मोदी म्हणाले, 'निवडणूका जवळ आल्या की अर्थसंकल्प सादर केला जातो. आम्हीही तीच परंपरा पाळू आणि नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पूर्ण अर्थसंकल्प सादर करू. तर अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करतील. मला विश्वास आहे की देश प्रगतीची नवीन शिखरे पार करत पुढे जात आहे असेही मोदी म्हणाले.

सर्वपक्षीय बैठक

दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने मोदी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावे असे आवाहन सरकारतर्फे यावेळी विरोधकांना करण्यात येणार आहे.

जम्मू-काश्मीरसाठीही अर्थसंकल्प

अर्थमंत्री सीतारामन अंतरिम अर्थसंकल्पात यावेळी जम्मू-काश्मीरसाठी ही अर्थसंकल्प सादर करतील असे बोलले जात आहे. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fish Transport Technology: जिवंत माशांच्या वाहतुकीसाठी स्मार्ट कॅरी बॅग

Dam Storage: अकोला, बुलडाण्यातील प्रकल्प तुडुंब

Khandesh Heavy Rain: खानदेशात २५ हजार हेक्टरवरील पिकांची वाताहत

Water Conservation: लोकसहभागातून जलसमृद्ध गावाची लोक चळवळ व्हावी

Solapur Heavy Rain: सोलापुरात आठ मंडलांत अतिवृष्टी,सोयाबीनसह तूर, उडदाचे नुकसान

SCROLL FOR NEXT