PM Narendra Modi  Agrowon
ॲग्रो विशेष

PM Narendra Modi : 'माझा पूर्ण फोकस शेतकरी, तरूण, महिला आणि गरीबाच्या सक्षमीकरणावर' : मोदी

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यात चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले असून पाचव्या टप्प्यातील मतदान काहीच दिवसात होणार आहे. यासाठी सध्या भाजपसह महायुतीकडून मुंबईसह नाशिकमध्ये आज जनसभा आणि रँलीचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान पिंपळगाव येथील जनसेभेला बुधवारी (ता. १५) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. यावेळी मोदींनी काँग्रेससह शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. तसेच मोदी यांनी आपले पूर्ण लक्ष हे देशातील शेतकरी, तरूण, नारी शक्ती आणि गरीबाच्या सक्षमीकरणावर असल्याचे म्हटले आहे. 

नाशिकच्या पिंपळगाव आयोजित जनसभेला संबोधित करताना मोदी पुढे म्हणाले, राज्यासह देशातील शेतकऱ्यांनी माझ्या १० वर्षांचा कार्यकाळ पाहिला आहे. याआधी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा कार्यकाळ देखील पाहिला आहे. तेंव्हा कृषीमंत्री हे राज्यातीलच होते. त्यावेळी काँग्रेससह राष्ट्रवादीने शेतकऱ्यांची कोणतीच काळजी केली नाही. आज पीएम किसान सन्मान निधीतून १२ हजार रूपये शेतकऱ्यांना दिले जातात. याचा अर्थ पुढच्या ५ वर्षात ६० हजार रूपये शेतकऱ्यांना दिले जातील.

काँग्रेसच्या काळात खोटी पँकेज दिले जात होते. आम्ही शेतकऱ्यांचे हित कायमच वरती ठेवले आहे. कांदा आणि द्राक्ष पट्टा म्हणून नाशिक प्रसिद्ध आहे. हे आमचे सरकार आहे जे पहिल्यांदा कांद्याचा बफर बनवला. आम्ही मागील वर्षी सात लाख मेट्रीक टन कांदा खरेदी केला आहे. तसेच आता ५ लाख कांद्याचा बफर स्टॉक करण्यास सरकार कामाला लागल्याचे मोदी म्हणाले.

आमच्या सरकरच्या प्रयत्नांमुळे कांद्याची निर्यात ही ३५ टक्क्यांनी वाढली आहे. तर १० दिवसांच्या आधीच कांदा निर्यात बंदी हटवण्यात आली. तर आता ऑपरेशन ग्रीनद्वारे सरकार कांदा उत्पदांना सबसीडी देत असल्याचे मोदी म्हणाले. 

यावेळी मोदी यांनी नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी म्हणत शरद पवारांसह उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला. काँग्रेसला आम्ही मंदीर उद्घाटनाचे आमंत्रण दिले मात्र त्यांनी ते स्विकारले नाही. याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी देखील आमंत्रण नाकारून काँग्रेच्या पावलांवर पाऊल ठेवले. काँग्रेसवाले सावरकरांना शिव्या देत असतानाही हे नकली शिवसेनावाले यांना खांद्यावर घेऊन फिरत आहेत. यामुळे नकली शिवसेनेने काँग्रेससमोर गुढगे टेकले असून याचा धडा महाराष्ट्रातील जनता त्यांना शिकवलेल. चारी टप्प्यात महाराष्ट्राच्या जनतेने मतदानात इंडिया आघाडीला चितपट केले आहे.

दरम्यान शरद पवार यांच्या छोटे पक्ष काँग्रेसमध्ये सामिल होतील यावरून देखील मोदींनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, येथील इंडिया आघाडीच्या नेत्याला वाटते की येथील लहान लहान पक्ष काँग्रेसमध्ये विलिन व्हायला हवेत. तरच त्यांचा विरोधी पक्ष बनेल अशी पवार यांच्यावर टीका केली आहे.

तसेच खोटी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये नक्कीच विलिन होतील. त्यावेळी आपल्याला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल. जे सद्या शिवसेनेत घडत आहे यामुळे सर्वाधिक दु:ख बाळासाहेबांना झाला असेल. बाळासाहेब ठाकरेंचे अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे स्वप्न होते. ते पूर्ण झाले. पण खोट्या शिवसेनेची यामुळे चिडचिड होत असल्याचा टोला देखील मोदींनी लगावला. 

काँग्रेसवर हल्लाबोल

मोदी म्हणाले, काँग्रेससाठी फक्त अल्पसंख्याक महत्वाचे असून मुसलमान ही त्यांची स्वतःची आवडती व्होट बँक आहे. त्यांनी एससी, एसटी आणि इतरांचे आरक्षण काढून मुस्लिमांना द्यायचे आहे. यांचा पैसा देखील मुस्लिमांवर खर्च करायचा आहे. यासाठी काँग्रेसवाल्यांनी त्यांच्या काळात प्रयत्न केला होता. मात्र मी मुख्यमंत्री असताना मी याला कडाडून विरोध केला. काँग्रेसला देशाचा संपूर्ण अर्थसंकल्प बदलवायचा होता. त्यांना अर्थसंकल्पात १५ टक्के खर्च फक्त मुस्लिमांवर खर्च करायचा होता. पण हे मी असूपर्यंत होणार नाही असा इशाराही मोदींनी दिला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले

नाशिकच्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गंगा पुत्र मोदींनी फाँर्म भरल्यानंतर दक्षिण काशीत असणाऱ्या गोदावरीच्या किनाऱ्यावर जनतेला भेचटण्यासाठी आले आहेत. गंगापुत्र मोदीजींना नाशिक, नगर, मराठवाड्यात पश्चिमी वाहिनीच्या पाणी आणायचं आहे.  यासाठी मोदींचा आशीर्वाद आपल्याला हवा असून मोदी है तो मुमकीन है, असे फडणवीस म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT