PM Narendra Modi : 'त्यांचा पंजा शेतकऱ्यांचा निधी हिसकवायचा'; मोदी यांचा सोलापुरनंतर धाराशिवमधून काँग्रेसवर हल्लाबोल

Urea, Pulses and Oilseeds : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरच्या माढा येथील सभेतून उसाच्या प्रश्नावरून काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यानंतर धाराशिव येथील सभेतून मोदी यांनी युरिया, कडधान्ये आणि तेलबिया खरेदीवरून काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiAgrowon
Published on
Updated on

Pune News : सोलापुरच्या माढा येथे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत काँग्रेसह शरद पवार यांच्यावर मोदी यांनी टीका केली. यापाठोपाठ मोदी यांनी धाराशिव येथे महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पुन्हा एकदा टीका केली. मोदी यांनी, काँग्रेस आणि इंडिया आघाडी वाल्यांची अवस्था अशी झाली आहे की, फक्त खोटे बोलून चालणार नाही. तर एआयच्या माध्यमातून बनावट व्हिडीओ विकले जाऊ लागले आहेत. मोदींच्या भाषणाचा वापर करून खोटे नाटे पसरवले जात आहे. 

पुढे मोदी म्हणाले, मी तुमचे जीवन बदलण्यासाठी रात्रंदिवस काम करतो. मात्र इंडिया आघाडीचे लोक मोदींना बदलण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. मला तुमचे जीवन बदलायचे आहे, परंतु त्यांना मला बदलायचे आहे. पण त्यांना देशाबद्दल, शेतकऱ्याबद्दल काही वाटत नाही. 

PM Narendra Modi
PM Narendra Modi : 'जे १० वर्षात सत्तेत होते, त्यांनी उसाला २०० हून अधिक एफआरपी दिली नाही'; मोदींची सोलापूरात टीका

पण आम्ही सत्तेत आलो ते तुमचे जीवन बदलण्यासाठी. काँग्रेसचे सरकार असताना शेतकऱ्यांच्या वाट्याला येणाऱ्या निधीवर डल्ला मारला जात होता. शेतकऱ्याच्या वाट्याला येणाऱ्या खतवर डल्ला मारला जायचा. यामुळे युरियासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत होते. मात्र आम्ही सत्तेत आलो आणि हे चित्र थांबले आहे. आता आमच्या सरकारने युरियाच्या एका पोत्याचे काम एका बाटलीत आणले आहे. शेतकऱ्यांना युरियाचा तुटवडा भासणार नाही याची काळजी घेतली जात आहे. गेल्या वर्षीच आम्ही शेतकऱ्यांना अडीच लाख कोटी रुपयांची सबसिडी दिली असेही मोदी म्हणाले. 

यावेळी मोदींनी कडधान्ये आणि तेलबिया खरेदीवरून काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. मोदी म्हणाले, काँग्रेसने त्यांच्या काळात फक्त १२ हजार कोटींचे कडधान्ये आणि तेलबिया खरेदी केल्या. तर आमच्या फक्त १० वर्षांच्या काळात सुमारे १.२५ लाख कोटीं रुपयांचे कडधान्ये आणि तेलबिया खरेदी करून शेतकऱ्यांना पैसे पोहचवले आहेत. एनडीएने काँग्रेसपेक्षा १० पट कडधान्ये आणि तेलबियांच्या खरेदीत पैसे दिले आहेत. हा फक्त ट्रेलर आहे. आता मोदीचे मिशन हे कडधान्ये आणि तेलबियांच्याबाबतीत देशाला आत्मनिर्भर करायचे आहे. प्रत्येक वर्षी देशाला डाळी आणि तेलासाठी लाखो कोटी रूपये इतर देशांना द्यावे लागते. पण आता ते पैसे शेतकऱ्यांना द्यायचे आहेत. 

PM Narendra Modi
PM Narendra Modi : 'मागील ६० वर्षांच्या काळात एससी/एसटी/ओबीसींची सर्वात वाईट अवस्था'; मोदी यांची काँग्रेसवर टीका 

आपला महाराष्ट्र हा सहकाराची जननी आहे. यामुळे आम्ही येथे सहकाराचे जाळे अधिक घट्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. गेल्या १० वर्षात राज्यात शेतकरी संघाच्या माध्यमातून नवे एपीओ तयार करण्यात आले आहेत. तसेच जगातील सर्वात मोठी गोदाम योजना देखील सुरू करण्यात आली आहे. हजारो गोदाम यातून करण्यात आले असून याचे काम सहकारी संस्थांकडे देण्यात आले आहे. 

राज्यात श्री अन्न म्हणून ओळख असणाऱ्या अन्नला देशाच्या काणोकोपऱ्यात पोहचवण्यात येईल. याचा थेट लाभ हा ज्वारी उत्पादकांना होणार आहे. यादरम्यान देशाचा मी पहिला पंतप्रधान असेन ज्याच्यासाठी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यावेळी तेथे प्रत्येकाच्या ताटात श्री अन्न होते. जे सुपर फूड म्हणून ओळखले जाते

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com