Prime Minister Narendra Modi Agrowon
ॲग्रो विशेष

Prime Minister Narendra Modi : 'भारताची बँकिंग प्रणाली जगात मजबूत'; पंतप्रधान नरेंद्र मोदी

Reserve Bank of India Anniversary : पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून ते भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ९० व्या वर्धापन दिनाच्या समारंभात सहभागी झाले आहेत. यावेळी पीएम मोदी यांनी ९० रुपयांचे नाणे जारी केले.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : 'भारतीय रिझर्व्ह बँकेने देशाला नवी दिशा देण्यासह देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावली, असे' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकेच्या ९० व्या वर्धापन दिनाच्या समारंभात सोमवारी (ता. १) वक्तव्य केले. तसेच ग्रामीण अर्थव्यवस्था आणि  यूपीआयला आरबीआयमुळे चालना मिळाली. सध्या भारताची बँकींग व्यवस्था ही जगात मजबूत असून ती आघाडीची बँकीग व्यवस्था मानली जातेय, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

आरबीआयचा ९० वा वर्धापन दिनाचा कार्यक्रम नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स नरिमन पॉइंट, मुंबई येथे आयोजन करण्यात आला होता. यावेळी राज्यपाल रमेश बैस, अर्थमंत्री निर्मला सीतारमन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते.

"आज भारतीय रिझर्व्ह बँकेने ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. आरबीआयने ९० वर्षे पूर्ण केली आहेत. आरबीआयने या काळात स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यनंतर असे दोन्ही काळ पाहिलेत. आज आरबीआयने आपल्या व्यावसायिक गुण आणि वचनबद्धतेमुळे आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तर आरबीआयला आज ९० वर्षे पूर्ण होत असून मी सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो." असेही मोदी म्हणाले.

यावेळी मोदी म्हणाले, एकेकाळी देशातील अर्थव्यवस्था ही तोट्यात होती. पण आज ती नफ्यात आली आहे. हे फक्त बँकीग व्यवस्थेतील स्थित्यांतरांचा अभ्यास केल्याने शक्य झाले आहे. तर कोरोनाच्या काळात देशातील बँकीग व्यवस्था डगमगली होती. पण आरबीआयच्या धोरणांमुळे गेल्या १० वर्षात बँकींग क्षेत्रात मोठ्या सुधारणा झाल्या. यामुळे गेल्या १० वर्षात जे झाले तो फक्त  ट्रेलर आहे. येत्या काळात आणखी मोठे बदल होतील. ते घडवायचे आहेत, असेही मोदी म्हणाले.

 "आज देश पाहत आहे, जेव्हा हेतू योग्य असतात तेव्हा धोरण योग्य असते. तर जेव्हा धोरण योग्य असते तेव्हा निर्णय योग्य असतात. आणि जेव्हा निर्णय योग्य असतात तेव्हा परिणाम योग्य समोर येतात", असेही मोदी म्हणाले. तसेच मोदी म्हणाले, "देशाला अशी धोरणे बनवण्याची गरज आहे जेणेकरून बँकिंगची सुलभता सुधारेल आणि प्रत्येकाला त्यांच्या गरजेनुसार कर्ज मिळू शकेल." 

अर्थव्यवस्थेत आत्मविश्वास निर्माण झाला

यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, आरबीआयच्या धोरणांमुळे चलनवाढीच्या अपेक्षांवर नियंत्रण आले आहे. यात आरबीआयने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तसेच आरबीआयने संप्रेषण धोरण आखले. यामुळे अर्थव्यवस्थेत आत्मविश्वास निर्माण झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT