Narendra Modi and Rahul Gandhi Agrowon
ॲग्रो विशेष

Narendra Modi and Rahul Gandhi : निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदी वाशीममध्ये तर राहुल गांधी कोल्हापुरमध्ये दाखल

Aslam Abdul Shanedivan

Pune News : काहीच दिवसात राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्रामाला सुरूवात होणार आहे. यामुळे राज्यात सध्या केंद्रीय नेत्यांच्या दौऱ्यांना वेग आला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी शनिवारी (ता.५) राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत. मोदी आज विविध विकास कामांचे लोकार्पण वाशीमसह मुंबईत करणार आहेत. तर राहुल गांधी कोल्हापुरमध्ये दाखल झाले असून येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण करतील. यामुळे या दोन्ही बड्या नेत्यांच्या दौऱ्यासह पंतप्रधान मोदी आणखी काही घोषणा करतात का? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गुरूवारी (ता.३) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याला मोठे गिफ्ट दिले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून मान्यता देण्यात आली. यानंतर आता ते मुंबई येत आहेत. वाशिम आणि ठाणे येथे विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते केले जाणार आहे.

मोदी वाशिममध्ये २३ हजार ३०० रुपयांच्या कृषी आणि पशुपालन क्षेत्रातील विविध उपक्रमांचा शुभारंभ करतील. या योजनेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा १८वा हप्ता वितरित केला जाईल. यामुळे राज्यातील ९.४ कोटी शेतकऱ्यांना थेट २० हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. याचबरोबर पंतप्रधान मोदी कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत सुमारे १ हजार ९२० कोटी रुपयांचे ७ हजार ५०० हून अधिक प्रकल्प समर्पित करतील. तसेच, ९ हजार २०० शेतकरी उत्पादक संघटनांचे राष्ट्रार्पण करतील. तसेच, बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचे प्रतीक असलेल्या “बंजारा विरासत संग्रहालयाचे” प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

तसेच देशी गायीच्या संगोपणासाठी ‘युनिफाइड जीनोमिक चिप’ लॉन्च केले जाणार आहे. या तंत्रज्ञानाने गाईच्या गर्भधारणेसाठी लिंग वर्गीकरण करणं, शक्य होणार आहे. ज्यामुळे देशी गाईंच्या उच्च प्रतिच्या फक्त कालवडी जन्माला येतील. याचबरोबर मोदींच्या हस्ते मुंबई मेट्रो- ३ चं लोकार्पण देखील होणार आहे.

राहुल गांधी कोल्हापुरात

काँग्रेस नेते राहुल गांधी देखील आज कोल्हापूर दाखल झाले आहेत. कोल्हापूरच्या कसबा- बावडा येथे त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केले जाणार आहे. तसेच ते संविधान सन्मान कार्यक्रमाला देखील उपस्थित असतील. याआधी शुक्रवारी राहुल गांधी यांचा कोल्हापूर दौरा होता. मात्र तो विमानाच्या तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Return Monsoon : परतीचा माॅन्सून महाराष्ट्रात दाखल; राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

Amaravati DCC Bank : धोरणात्मक निर्णय घेण्याची अमरावती जिल्हा बँकेवर बंदी

Marathwada Drought : मराठवाड्यातील दुष्काळ आणि अतिवृष्टी

MSP Procurement : मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी नावनोंदणी सुरू

Sugarcane Bill : दत्त साखर कारखाना मागील गळीत हंगामातील १०० प्रमाणे शेतकऱ्यांना दुसरा हप्ता देणार

SCROLL FOR NEXT