Onion And Coriander Agrowon
ॲग्रो विशेष

Onion And Coriander Market : सोलापुरात कांदा आणि कोथिंबीरीने शेतकऱ्याच्या डोळ्यात आणले पाणी

Agricultural Produce Market Committee of Solapur : देशातील विविध राज्यात सध्या थंडीचा जोर वाढला आहे. अनेक राज्यात पारा १० अंशाच्या खाली आला आहे. ज्याचा फटका शेती पिकांवर बसत असून शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यातील शेतकऱ्याच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाही. निर्यात बंदीमुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला आता त्याच्या पिकाला भाव देखील मिळत नसल्याचे समोर येत आहे. गेल्या काही महिन्यापासून कांद्याला दर मिळत नसतानाच आता कोथिंबीरीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. तर कांद्याच्या दरात पुन्हा एकदा २०० रूपयांनी घसरण झाली आहे. तसेच कोथिंबीरीला भाव नसल्याने कोथिंबीर कवडीमोल दराने विकावी लागत आहे. यामुळे कोथिंबीर उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत.

दरम्यान सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक मोठी झाली आहे. बाजार समितीत १५०० गाड्या आल्याने झाली आहे. यामुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली. आवक वाढल्याने २०० रुपयांनी कांद्याचे दर घसरले आहेत. मंगळवारी कांद्याला १२०० ते १४०० रुपये इतका भाव होता. आज मात्र कांद्याला ८०० ते १२०० रुपये इतका भाव आहे.

सलग दोन दिवस बाजार समिती बंद

सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समिती बुधवारी बंद होती. तर शुक्रवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त बाजाराला सुट्टी राहणार आहे. त्यामुळे गुरूवारी मोठी आवक वाढली.

कोथिंबीर रस्त्यावर फेकली

सोलापुरात कोथिंबीरीलाही दर मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. कोथिंबीरीला भाव नसल्याने आक्रमक शेतकऱ्यांनी कोथिंबीर रस्त्यावर फेकली. तर भाव नसल्याने शेतकरी चांगलेच संतप्त झाले.

नाशिक, जळगावात गारठले, कोकणात अवकाळीची शक्यता

उत्तर भारतात पडलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम राज्यात जाणवत आहे. येथील नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात पारा ९ अंशाच्या खाली गेला आहे. नाशिक जिल्ह्याच्या निफाडमध्ये पारा घसरला असून ४.४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर जळगावात थंडी वाढली असून येथे ९ अंश तापमानची नोंद झाली आहे. दरम्यान हवामान खात्याने राज्यातील ढगाळ वातावरणामुळे कोकणात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT