Vegetable Market agrowon
ॲग्रो विशेष

Vegetable Market : आठवडा बाजार! असे आहेत फळभाज्यांचे दर, फुलांचा बाजारही तेजीत

Fruits and Vegetables : फूलबाजारातही तेजी असून झेंडू, निशिगंध, गुलाब, शेवंती, गलांडा यांना अधिक मागणी आहे.

sandeep Shirguppe

Vegetable Rate : श्रावण सुरू झाल्याने मांसाहर विक्री कमी झाल्याने बाजारात भाजीपाल्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे आठवडा बाजारात मेथी, कांदापात, पोकळा आदी भाज्यांना चांगला दर मिळत आहे. तर वांगी, दोडका, पडवळ, श्रावण घेवडा, वरणा, उसावरील शेंगा, भेंडीची आवकही वाढली असून, दरही चांगला मिळत आहे.

विशेषतः वांगी प्रतिकिलोचा भाव ८० रुपये असा आहे. लसूण २०० ते २५० रूपये असा दर मिळत आहे. तर मिरचीलाही चांगला दर मिळत आहे.

आज आठवडा बाजारात सोमवारची तयारी म्हणून गर्दीचे चित्र होते. गेले अनेक दिवस टोमॅटोने भाव घेतला होता. मात्र, गेल्या आठवड्यापासून १५ ते २० रुपये असा किलोला भाव पडला आहे, तर कांदा, बटाटा प्रतिकिलो चाळीस रुपये असा अनेक दिवसांपासून टिकून आहे. दरम्यान, फूलबाजारातही तेजी असून झेंडू, निशिगंध, गुलाब, शेवंती, गलांडा यांना अधिक मागणी आहे.

फळभाज्यांचे किलोचे दर (रुपयांत)

वांगी ६० ते १००, दोडका ६० ते ७०, ढब्बू मिरची ६० ते ७०, पडवळ ६०, गवार ८० ते १००, श्रावण घेवडा ८० ते १००, भेंडी ६०, ओली मिरची ८० ते १००, दुधी भोपळा २० ते ३० रु. नग, कोबी २० ते ४० रु. नग, फ्लॉवर २० ते ४० रु. नग, टोमॅटो १५ ते २०, कारली ६०, हिरवा वाटाणा ६० ते ८०, वरणा ८०, उसावरील शेंगा ६०, काकडी ४० ते ६०, गाजर ४०, बीट १० रु. नग, मका कणीस १० रु. नग, शेवगा शेंग १० रु. दोन नग, मुळा १० ते १५ रु. नग.

पालेभाज्यांचे दर प्रतिपेंढी (रुपयांत)

कांदापात २०, मेथी २० ते ३०, शेपू २०, पोकळा १०, पालक १५, मिश्र भाजी १० ते २०रु. वाटा, कोथिंबीर १० ते १५.

फुलांनाही वाढली मागणी

श्रावणमासामुळे फुलांनाही मागणी वाढली आहे. झेंडू १४० रु किलो, निशिगंध ३०० रु किलो, गुलाब- ३०० रु, गलांडा- २००रु.

खाद्यतेलाचे किलोचे दर (रुपयांत)

शेंगदाणा तेल २०० ते २०४, सरकी ११५, सूर्यफूल १२४, पामतेल ११२, खोबरेल २४०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Trade Unions Farmers Protest: १२ फेब्रुवारीला देशव्यापी संप; कामगार, शेतकरी संघटनांची घोषणा

Tur Farming: कपाशीचे वाजले, तर तूर पिकाने साधले

Ahilyanagar Mayor Election: चौथ्यांदा मिळणार महिलेला महापौरपदाची संधी

Power Supply Disconnected: तीन हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

Sugarcane Drip Irrigation: उसासाठी ठिबक सिंचन संचाची निवड

SCROLL FOR NEXT