Sugarcane Rate agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Rate : साखर कारखानदारांकडून ऊसदराची कोंडी फोडण्याचा प्रयत्न, चार कारखान्यांकडून दर जाहीर

Raju Shetti : माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात गत वर्षाच्या हंगामातील प्रतिटन ४०० रुपये मिळावेत यासाठी मागच्या महिन्यापासून आंदोलन सुरू आहे.

sandeep Shirguppe

Sugar Factory : माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात गत वर्षाच्या हंगामातील प्रतिटन ४०० रुपये मिळावेत यासाठी मागच्या महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. याचबरोबर त्यांनी कारखानदारांच्या दारात जात आक्रोश यात्रा सुरू करून यावर्षीचा हंगाम सुरू करू देणार नसल्याची घोषणा केली. दरम्यान कारखानदारांना गतवर्षीसह यंदाच्या हंगामातील दर निश्चित केल्याशिवाय धुराडे पेटवू देणार नसल्याची घोषणा केली आहे.

अशातच हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील चार कारखान्यांनी यावर्षीच्या हंगामात प्रतिटन तीन हजार एक रुपये दर विनाकपात देणार असल्याची घोषणा करून दराची कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. यात टाकळीवाडी, गुरुदत्त- जवाहर आवाडे- हुपरी, दत्त- शिरोळ व शरद नरंदे या कारखान्यांचा समावेश आहे.

या चारही कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांचे पत्रच सोशल मीडियावर व्हायरल झाले. याबाबत जवाहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक आमदार प्रकाश आवाडे आणि 'शरद- नरंदे'चे अध्यक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. त्याचबरोबर हंगाम समाप्तीनंतर रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युला (आरएसएफ) नुसार निघणारा अंतिम दर साखर आयुक्तांच्या मान्यतेने देण्यात येणार असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.

ऊस दराच्या प्रश्नावरून महिन्याभरापासून विविध संघटनांतर्फे वेगवेगळ्या मार्गाने आंदोलने सुरू आहेत. मागील फरक आणि चालू हंगामातील दर निश्चितीशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही आणि कारखान्यातून साखर बाहेर जाऊ देणार नाही, असा पवित्रा शेतकरी संघटनांनी घेतला आहे.

त्यातच नजीकच्या सीमावर्ती कर्नाटकातील कारखान्यांकडून एफआरपीनुसार ३५६४ रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी त्यातून सरासरी तोडणी व ऊस वाहतून खर्च वजा करता प्रत्यक्षात सरकारी अनुदानासह २९०० रुपये मिळणार आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर हातकणंगले आणि शिरोळ या दोन तालुक्यांतील श्री गुरुदत्त शुगर्स टाकळीवाडी, शरद सहकारी साखर कारखाना नरंदे, कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना हुपरी आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना शिरोळ या साखर कारखान्यांनी सन २०२३ -२४ या हंगामात गळीतासाठी येणाऱ्या उसाला प्रतिटन ३००१ रुपये एफआरपीनुसार विनाकपात एकरकमी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रसिद्धी पत्रक दिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon 2026: माॅन्सूनची आगेकूच सुरुच; माॅन्सूनने संपूर्ण अंदमान आणि निकोबर बेटे व्यापून वाटचाली कायम ठेवली

Farm Loan Repayment: यंदाच्या वर्षातील वसूलपात्र रक्कम मुदतीत भरा : मंत्री हसन मुश्रीफ

Onion Rate Issue: कांदा साठवावा तर सडतोय, विकावा तर मातीमोल भाव

Interview with Raju Shetti: ‘कोकणच्या पुढाऱ्यांनी प्रश्‍नांचं गांभीर्य समजून घ्यावं’

Khandesh Irrigation Projects: खानदेशातील अनेक सिंचन प्रकल्प अपूर्ण

SCROLL FOR NEXT