Cashew Farmers agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Farmers : सोयाबीन, कांदा, कापसानंतर काजूला हमी भावापेक्षाही कमी दर, तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा एल्गार

Cashew Production Sindhudurg : सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील १७ तालुक्यांमध्ये (ता. १६) धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

sandeep Shirguppe

Cashew Farmers Protest : काजू बी ला हमीभावासाठी तीन जिल्ह्यांतील काजू उत्पादक प्रथमच एकवटले असून त्यांनी आक्रमक भूमिका घेत एल्गार पुकारला आहे.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील १७ तालुक्यांमध्ये (ता. १६) धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये उत्पादनक्षम काजू लागवडीचे क्षेत्र वाढलेले आहे. तीन जिल्ह्यांतील लाखो कुटुंबाच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत काजू उत्पादन आहे. तीन जिल्हह्यांची काजू बी पासूनची उलाढाल साधारणपणे चार ते साडेचार हजार कोटी रुपयांची आहे.

मात्र, गेल्या काही वर्षात काजू बो दरांमध्ये झालेली घसरण आणि बदलत्या वातावरणाचा उत्पादनावर झालेला परिणाम यामुळे उत्पादक आर्थिक सर्कटात सापडला आहे. कोरोनानंतर काजू उत्पादकांचे कंबरडेच मोडले आहे. त्यामुळे काजू उत्पादकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. यावर्ची तरी काजू वी ला दर मिळेल, अशा प्रतीक्षेत असलेल्या उत्पादकांची घोर निराशा झाली.

प्रतिकिलोला १२६ चा दर जाहीर झाल्यानंतर काजू उत्पादक अधिकच आक्रमक झाले आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाने काजू बी ला प्रतिकिलो १२९.५० रूपये खर्च येतो आणि प्रत्यक्षात तीन ते चार रुपये तोट्यात काजू बी विक्री करावी लागत आहे, असा निष्कर्ष काढला आहे. त्यामुळे जिल्ह्यासह रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील उत्पादक आंदोलनाचे नियोजन करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Drought Situation: दुष्काळस्थितीत यंत्रणांनी सतर्क राहावे : कृषिमंत्री भरणे

Ghodganga AGM Controversy: ‘घोडगंगा’च्या सभेत घोषणाबाजीने गोंधळ

Illegal Water Extraction: तलाव आटले, तरीही अवैध पाणीउपसा सुरू

Farmers Protest: २३ सप्टेंबरला मंत्र्यांना काजू, बदाम पाठवून राज्यभर आंदोलन, किसान सभेची घोषणा

SCROLL FOR NEXT