Pump Theft Agrowon
ॲग्रो विशेष

Pump Theft : शिरूरमध्ये रोहित्रासह पंपांच्या चोऱ्या रोखा

Team Agrowon

Shirur News : शिरूर तालुक्यात सध्या विद्युत रोहित्र, विद्युत पंप तसेच केबल चोऱ्यांच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर नुकतेच प्रांताधिकाऱ्यांनी याबाबत बैठक घेतली. चोऱ्या रोखण्याबाबत उपाययोजना करण्याचे आदेश पोलिस व विद्युत वितरण प्रशासनाला दिले.

शिरूर तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात रोहित्र, विद्युत पंप तसेच केबल चोरीच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. वर्षभरात शिरूर तालुक्यातून तब्बल १६१ विद्युत रोहित्र चोरीला गेले आहेत. सामाजिक कार्यकर्ते नीलेश वाळुंज यांनी या चोऱ्यांबाबत उपाययोजना करण्याची मागणी तहसीलदारांकडे केलेली आहे.

या पार्श्‍वभूमीवर प्रांताधिकारी हरेश सूळ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक घेण्यात आली. या वेळी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, विद्युत वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन, सुमीत जाधव, शिरूरचे पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे, रांजणगावचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, सामाजिक कार्यकर्ते नीलेश वाळूंज, शिवाजी खेडकर आदी उपस्थित होते.

दरम्यान, सूळ यांनी अधिकाऱ्यांना योग्य सूचना देत प्रत्येक गावामध्ये पोलिसांनी ग्राम सुरक्षा दल स्थापन करून गावामध्ये गस्त वाढवावी. ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन सीसीटीव्ही बसवावेत, आदी निर्णय या वेळी घेण्यात आले.

गेल्या काही महिन्यांपासून रोहित्र चोरीच्या घटना वाढत आहेत. तालुक्यात कुठेही रोहित्र चोरीची घटना घडत असल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी तत्काळ ११२ क्रमांकावर संपर्क करावा.
- नितीन महाजन, उपकार्यकारी अभियंता, विद्युत वितरण विभाग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT