Water Scarcity Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : खानदेशात टंचाईबाबत प्रशासनाची तयारी

Water Crisis : खानदेशात टंचाई जाणवू लागली असून, पुढे सुमारे एक हजार गावांत पाण्याची समस्या राहू शकते, असा अंदाज प्रशासनास आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात टंचाई जाणवू लागली असून, पुढे सुमारे एक हजार गावांत पाण्याची समस्या राहू शकते, असा अंदाज प्रशासनास आहे. जळगावात सुमारे ५९२ , धुळ्यात ३०० आणि नंदुरबारातही सुमारे २१५ गावांत टंचाई राहील, अशी शक्यता आहे.

धुळ्यात २० टक्के, नंदुरबारात १९ टक्के एवढी पावसाची तूट होती. धुळ्याचे एकूण पर्जन्यमान ५७५ मिलीमीटर, नंदुरबारचे ८६० मिलीमीटर एवढे पाऊसमान आहे. परंतु दोन्ही जिल्ह्यांत जवळपास ८० टक्केच पाऊस झाला.

धुळ्यातील टंचाई अधिक तीव्र राहील. तसेच सातपुडा पर्वतातहीही टंचाईची समस्या राहणार आहे. नंदुरबार, नवापूर तालुक्यात टंचाई अधिक राहील. धुळ्यात साक्री, धुळे व शिंदखेडा तालुक्यास दुष्काळाची झळ अधिक बसेल, अशीही स्थिती आहे.

जळगाव जिल्ह्यात यंदा केवळ ८८.८ टक्के पाऊस झाला आहे. तब्बल बारा टक्के पाऊस कमी झाला आहे. यामुळे जिल्ह्यात संभाव्य ५९२ गावांमध्ये पाणीटंचाई जाणवेल असा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे.

त्यासाठी ९ कोटी ९० लाख रुपयांचा टंचाई कृती आराखडा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंजूर केला आहे. लवकरच हा आराखडा शासनाला सादर केला जाईल. २०२३-२४ साठी जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत तयार करण्यात आला.

यात जिल्ह्यात आगामी काळात ५९२ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाई जाणवणार असल्याची शक्यता असून उपाययोजना राबविण्यासाठी ९ कोटी ९० लाख ७४ हजार रुपयांचा खर्च लागणार आहे. हा आराखडा जिल्हाधिकाऱ्‍यांना सादर करण्यात आला होता. यास जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली आहे.

चाळीसगावात टँकर सुरूच

जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात पावसाळा संपूनही पाणीटंचाईची परिस्थिती कायम आहे. त्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील १३ गावांमध्ये १४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

जळगावात संभाव्य

पाणीटंचाईची गावे

तालुका गावे

जळगाव २१

जामनेर ६९

मुक्ताईनगर २०

पाचोरा २५

अमळनेर १०९

भडगाव १७

सावळ ९

बोदवड १२

चाळीसगाव ५७

चोपडा ८७

धरणगाव ३१

एरंडोल २८

पारोळा ८५

रावेर ९

यावल १३

एकूण ५९२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Competition: ‘अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांनी रब्बी पीक स्पर्धेत सहभागी व्हावे’

Soil Mining Scam: वाडा तालुक्यात चिंचघरमध्ये कोट्यवधींचा माती घोटाळा

Farmer ID: ‘फार्मर आयडी’अभावी साताऱ्यातील तीन हजार शेतकरी मदतीपासून वंचित

Latur APMC: अडत बाजारात हमीभावानेच शेतीमालाची खरेदी करा

Agrowon Podcast: शेवगा पोचला २० हजारांवर,हरभरा दबावातच,संत्री आवक कमी,ज्वारीचे दर टिकून

SCROLL FOR NEXT