Maharashtra Weather Update agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Weather Update : राज्यात गारठा कमी होणार?, हवामान खात्याकडून नवी अपडेट

Winter Season : पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेशमध्ये अनेक कोल्हापूर १६.३० भागांत किमान तापमान ६ ते ९ अंशांदरम्यान आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Winter Season : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात थंडीचे प्रमाण कमी अधिक प्रमाणात दिसत आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात गारठा कायम आहे तर नाशिक आणि विदर्भातील काही ठिकाणी तापमानाचा पारा १० अंशांखाली आहे. दरम्यान राज्याच्या किमान तापमानात वाढ होणार असल्याने गारठा काहीसा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

नैर्ऋत्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती दक्षिणेकडे सरकली आहे. उत्तर भारतात थंडी कमी झाली असून रविवारी (ता. २४) पंजाबमधील अमृतसर, हरियानातील भिवणी, नर्मूल येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेशमध्ये अनेक कोल्हापूर १६.३० भागांत किमान तापमान ६ ते ९ अंशांदरम्यान आहे.

काश्मीर खोऱ्यात दोन दिवस थंडी कमी झाली यानंतर पुन्हा थंडीची तीव्रता वाढली असून अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा उणे गेला आहे. काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये मागच्या २४ तासांत उणे २.१ किमान तापमानाची नोंद झाली. आदल्या रात्रीच्या तुलनेत तापमान तीन अंश सेल्सिअसने घटले आहे.

दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहेलगामध्ये हाडे गोठविणारी थंडी पडली असून येथे उणे ३.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. हे काश्मीर खोऱ्यातील सर्वाधिक थंड ठिकाण ठरले. श्रीनगरप्रमाणे पहेलगामध्येही आदल्या रात्रीच्या तुलनेत तीन अंशांनी पारा खाली गेला. या ठिकाणी आदल्या रात्री ०.२ अंश सेल्सिअस किमान तापमान होते.

बारामुल्ला जिल्ह्यातील प्रसिद्ध स्की रिसॉर्ट गुलमर्ग येथे उणे ३.५ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. काझीकुंडमध्ये उणे २ कोकेरनागमध्ये उणे १.१ आणि कुपवाडात उणे २.७ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले.

काश्मीर खोरे सध्या हिवाळ्यातील सर्वाधिक थंडीचा 'चिलाई कलान' हा ४० दिवसांचा हंगाम अनुभवत आहे. तो ३१ जानेवारीपर्यंत चालेल. या कालावधीत तापमान गोठणबिंदूखाली गेल्याने प्रसिद्ध दल सरोवरासह तलाव, नद्याही गोठतात. त्याचप्रमाणे, बर्फवृष्टीची शक्यताही अधिक असते.

राजस्थानही गारठले

राजस्थानात अनेक ठिकाणी थंडीत वाढ झाली असून सिकर जिल्ह्यातील फतेहपूरमध्ये नीचांकी ४.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. अलवार हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड ठिकाण ठरले. येथे ५.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पिलानीत ६.५, सिरोहीत ७.१ आणि चुरूत ७.३ अंश सेल्सिअस तापमान होते. पश्चिम, पर्व आणि उत्तर राजस्थानात रविवारी दाट धुके पसरले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nilanga Crop Competition Winners: निलंग्यात पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार

Farm Loan Waiver Benefits: पुढील आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

Nashik Annual Credit Plan: नाशिक जिल्ह्यासाठी ६० हजार ५७५ कोटींचा पतपुरवठा आराखडा मंजूर

Fruit Crop Insurance Scheme: फळपीक विमा योजनेच्या अर्जास प्रारंभ

NAFED Onion Procurement: कांदा खरेदीसाठी ‘नाफेड’ने जनजागृती करावी : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

SCROLL FOR NEXT