Cotton Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Cultivation : गिरणा काठ परिसरात पूर्वहंगामी कापसाचे क्षेत्र घटले

Team Agrowon

Nashik News : जिल्ह्याच्या पूर्व भागात नांदगाव तालुक्यातील जळगाव जिल्ह्याच्या सीमाभागातील गिरणा काठच्या गावांमध्ये दरवर्षी पूर्वहंगामी कापूस लागवडी मोठ्या प्रमाणावर होत असतात. मात्र चालू वर्षी या लागवडी कमी झाल्याचे चित्र आहे. एकीकडे दुष्काळी परिस्थिती असल्याने पाण्याची उपलब्धता कमी होती.

त्यामुळे मे अखेर लागवडी तुलनेत कमी झाल्या आहेत. दुष्काळी परिस्थिती व कृत्रिम बियाणेटंचाई करून मनमानी दराने झालेल्या बियाणे विक्रीमुळे लागवड यंदा कमी झाल्याचे चित्र आहे. चालू वर्षी मेच्या तिसऱ्या सप्ताहात कापूस बियाणे विक्री सुरू झाली होती. मात्र विक्री सुरू झाल्यानंतर काही वाणांची मागणी वाढल्याने कृत्रिम टंचाई करून दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांचे कापूस लागवडीचे क्षेत्र कमी झाले.

काही शेतकऱ्यांनी मे मध्ये लागवडीचे नियोजन केले. मात्र बियाणे उपलब्ध होत नसल्याचे कारण पुढे करत अनेक शेतकऱ्यांवर बियाणे शोधण्याची वेळ आली आहे. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीत काही क्षेत्रात बियाणे उपलब्ध करत लागवडीला पसंती दिली आहे. नांदगाव तालुक्यातील बोराळे, आमोदे, गिरणा डॅम, मळगाव, कळमदरी तसेच आसपासच्या गावांमध्ये तुरळक लागवडी झाल्या आहेत.

कापूस लागवडी घटल्या; मक्याकडे कल

नांदगाव तालुक्यातील गिरणा घाट परिसरात १५० एकर क्षेत्रावर पूर्व हंगामी कापूस लागवड होत असते. मात्र त्यात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यंदा मनमानी दराने कापूस बियाण्यांची सुरुवातीच्या टप्प्यात विक्री झाली. त्यात बियाण्यांची उपलब्धता होत नव्हती व मागील वर्षी कापसाला अपेक्षित धरणा मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे.

त्यामुळे मातीत बियाण्यांसाठी पैसा टाकण्यापेक्षा मका लागवड करून उत्पन्न वाढ करू असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पूर्वहंगामी कापूस लागवडी घडल्या. त्यात नियमित लागवडी मृगानंतर होतील. मात्र कापूस लागवड घटण्याची चिन्हे आहेत. तर मका पिकाकडे कल दिसून येत असल्याचे चित्र आहे.

दरवर्षी १५ एकरवर कापूस लागवड असते. मात्र चालू वर्षी १० एकर पूर्वहंगामी लागवड आहे. तर बाकी लागवड बियाणे उपलब्ध झाल्यानंतर होईल. यंदा कापूस बियाणे विक्री मनमानी दराने होत आहे. त्यात भाव न मिळाल्याने यंदा लागवडी कमी राहतील, अशी स्थिती आहे. खर्च करून नुकसान व दर मिळत नसल्याने लागवडीची जोखीम कोण घेईल.
- नितेंद्र राजपूत, कापूस उत्पादक शेतकरी, बोराळे, ता. नांदगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT