Cotton Cultivation : मॉन्सूनपूर्व कपाशी लागवडीसाठी बळीराजा सरसावला

Cotton Sowing : सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या गावांमध्ये सिंचनाच्या सोयीसुविधा असल्याने पूर्वमोसमी कपाशीच्या लागवडीची लगबग वाढली आहे.
Kharif Sowing
Kharif Sowing Agrowon
Published on
Updated on

Akola News : सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या गावांमध्ये सिंचनाच्या सोयीसुविधा असल्याने पूर्वमोसमी कपाशीच्या लागवडीची लगबग वाढली आहे. एकीकडे कापसाला भाव मिळालेला नसल्याने हजारो क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात अद्यापही पडून आहे. दुसरीकडे नवीन हंगामासाठी बागायती क्षेत्रात पूर्वमोसमी कपाशी लागवड जोरात सुरू झालेली आहे.

जूनच्या दुसऱ्या आठवड्यात साधारणपणे पावसाचे आगमन होत असते. त्यामुळे खरीप हंगामाची चाहूल लागली आहे. दरवर्षी कपाशी लागवड करणाऱ्या भागात या दृष्टीने कामांना वेग आला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, असे शेतकरी या भागात दरवर्षी पूर्वमोसमी कपाशी लागवड करीत असतात. यंदाही हे शेतकरी लागवडीसाठी सऱ्या पाडणे, ठिबकच्या नळ्या अंथरणे, काडीकचरा वेचून शेत स्वच्छ करणे आदी कामे करण्यात व्यस्त आहेत.

Kharif Sowing
Kharif Sowing : खानदेशात यंदा धूळपेरणी नाहीच

यावर्षी राज्यात १६ मेपासून बीटी कपाशी बियाणे विक्री करण्यास परवानगी देण्यात आली होती. लागवडीला एक जूनपासून मान्यता आहे. यापूर्वी साधारणपणे २० मे नंतर कपाशीची लागवड सुरू व्हायची, परंतु गुलाबी बोंडअळीला पायबंद घालण्यासाठी कृषी विभाग आणि शास्त्रज्ञांनी उपाययोजना म्हणून पूर्वमोसमी लागवड न करण्याचे आवाहन केले होते.

Kharif Sowing
Kharif Sowing : यंदा सव्वासहा लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी प्रस्तावित

जुना कापूस घरातच

कापसाला मागील हंगामाच्या तुलनेत या वर्षात कमी दर राहिलेला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही कापसाची विक्री केलेली नाही. सध्या कापूस आठ हजारापर्यंत खाली आलेला आहे. दुय्यम प्रतीचा कापूस अवघा चार ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटल विकत आहे.

कापूस पीक उत्पादनाचा व्यवस्थापनावरील खर्च हा सरासरीच्या दीडपटीने वाढला आहे. रासायनिक खते, कीडनाशकांच्या भडकलेल्या किमती तसेच कापूस वेचणीचा खर्च, या सर्व बाबींमुळे कापूस उत्पादक आर्थिक अडचणीला सामोरा जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com