Kharif Season Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season Preparation : मॉन्सूनपूर्व पावसामुळे सांगलीत पूर्व मशागती सुरू

Pre-Monsoon Rain : अनेक भागांत पूर्व मशागतीही उरकल्या आहेत. समाधानकारक पाऊस सुरू झाल्यानंतर पूर्व मशागतींना गती येणार आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात दोन-तीन दिवसांपासून मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बळीराजा सुखावला असून खरीप हंगामाच्या पूर्व मशागती सुरू झाल्या आहेत. खरीप हंगामासाठी २८ हजार ५८१ क्विंटल बियाणे तर २ लाख २५ हजार ४८० टन खतांची मागणी केली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

जिल्ह्यातील खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २ लाख ५५ हजार ९८४ हेक्टर आहे. खरीप हंगामात बियाणे आणि खते यांची मागणी कृषी विभागाने करत तयारी पूर्ण केली आहे. दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागांत मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली.

यामुळे शेतकरी सुखावला आहे. अनेक भागांत रात्री हलका पाऊस झाला. या पावसामुळे खरीप हंगामाच्या पेरणीसाठी पूर्व मशागती शेतकऱ्यांनी सुरू केल्या आहेत. अनेक भागांत पूर्व मशागतीही उरकल्या आहेत. समाधानकारक पाऊस सुरू झाल्यानंतर पूर्व मशागतींना गती येणार आहे.

जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पाऊस झाला असला तरी, समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, खानापूर आणि तासगाव या दुष्काळी पट्ट्यासह शिराळा तालुक्यातील शेतकरी पावसाची प्रतीक्षा करू लागला आहे. जत तालुक्यात उडीद आणि तूर पिकांच्या पेरणीचे नियोजन शेतकरी करत आहेत.\

दरम्यान, कृषी विभागाने खरीप हंगामासाठी लागणाऱ्या बियाणे आणि खतांची मागणी केली आहे. यामध्ये बियाणे २८ हजार ५८१ क्विंटल तर २ लाख २५ हजार ४८० टन विविध खतांची मागणी केली आहे. सद्यःस्थितीला ८० हजार टन खते शिल्लक आहेत. हंगामात बियाणे आणि खतांची कमतरता भासणार नाही, याची दक्षता कृषी विभागाने घेतली आहे.

भात पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग

शिराळा तालुक्यात पश्चिम व उत्तर भागात धूळवाफेवरील भात पिकाच्या पेरण्या होतात. तालुक्यात वळीव पावसाने हजेरी लावली होती. पडलेला पाऊस खरीपपूर्व पेरणीला लाभदायक ठरला. त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने सर्वत्र खरीपपूर्व मशागतीला गती आली आहे. रोहिणीचा मुहूर्त साधण्यासाठी शेतकऱ्यांनी नियोजन सुरू केले आहे.

बियाणे मागणी (क्विंटलमध्ये)

सोयाबीन ९,८००

भात २,५७३

खरीप ज्वारी ३,१२०

बाजरी २,१६०

मका ८,५२०

तूर ३३६

मुग १३७

उडीद ६३८

भुईमूग १,२७६

सूर्यफूल २१

एकूण २८,५८१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Protest: शेतकरी कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर करा

Crop Insurance Compensation: तातडीने विमा भरपाईसाठी कंपन्यांना निर्देश देऊ

APMC Pune: शेतीमाल प्रक्रिया मूल्यवर्धन प्रकल्प उभारणार

Heavy Rainfall: नैसर्गिक आपत्तीतून वाचलेल्या कपाशीची वाताहत

Cooperative Bank Award: उत्कृष्ट सहकारी संस्थांना सन्मानाची ढाल प्रदान

SCROLL FOR NEXT