Kharif Season 2025: सोयाबीन, तूर, मुग बियाणे बदलात यंदा वाढीचा अंदाज!

Agriculture Seed Replacement: यंदाच्या खरिपात सोयाबीन, तूर व मुग पिकांमध्ये बियाणे बदलाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. नवीन वाणांचा वापर करून उत्पादनात वाढ करण्यावर भर दिला जात आहे.
Soybean, Tur, Moong
Soybean, Tur, MoongAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News: बियाणे बदलाचे प्रमाण यंदा वाढण्याचा अंदाज असून, त्यानुसार बियाण्यांची मागणी केली जात आहे. नवीन वाणांच्या बियाण्यांचा वापर करून उत्पादन अधिक घेण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून केले जाते. मात्र खरिपात वापरल्या जाणाऱ्या बियाणे बदलाचे प्रमाण गतवर्षीही कमीच होते. गेल्या वर्षी खरिपात (२०२४) केवळ बाजरीसाठी शेतकऱ्यांनी शंभर टक्के बियाणे बदल केला. तूर, सोयाबीन, मुगासह अन्य पिकांतही हे प्रमाण कमीच होते.

राज्यात खरिपात साधारणपणे मूग, उडीद, सोयाबीन, बाजरी, भात, तूर, मक्याची पेरणी, तर कापसाची लागवड करतात. राज्यात खरिपाचे यंदा १ कोटी ४२ लाख २ हजार ३१८ सरासरी क्षेत्र आहे. त्यात सर्वाधिक कापसाचे ४२ ते ४३ लाख हेक्टर, तर सोयाबीनचे ४२ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होते. खरिपात मूग, उडीद ही प्रमुख पिके आहेत. पावसाची सुरुवात लवकर झाली की मूग, उडदाचे क्षेत्र वाढीचा अंदाज असतो.

Soybean, Tur, Moong
Agriculture Research: संशोधनाला चालना देणारे ‘जनुकीय संपादन’

एकेकाळी खरिपात बाजरी अनेक जिल्ह्यांत प्रमुख पीक होते. आता मात्र बाजरीचे क्षेत्र घटत आहे. यंदा चांगल्या पावसाचे संकेत असून पेरणी लागवड क्षेत्रात वाढही होऊ शकते. मागील तीन वर्षांच्या बियाणे विक्रीवर बियाणे बदलाचे प्रमाण कृषी विभाग निश्‍चित करतो आणि त्यानुसार त्या त्या पिकांच्या बियाण्यांची मागणी केली जाते.

Soybean, Tur, Moong
Agricultural Assistants Designation: कृषी सहायकांच्या पदनाम बदलास नकार

कृषी विभागाकडे असलेल्या आकडेवारीनुसार बियाणे बदलात सर्वांत कमी बदल तुरीत होत आहे. पीक उत्पादनात वाढ करण्यासाठी कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे यांनी संशोधित केलेल्या वाणांचा वापर होत असला, तरी गत वर्षी घेतलेले उत्पादनातीलच बियाणे म्हणून वापर होत आहे.

कृषी विभागाच्या माहितीनुसार, गतवर्षी भात पिकांत ३४ टक्के बदल अपेक्षित असताना ३४ टक्के बदल झाला. बाजरीत १०० टक्के बदल झाला. मक्यात १०० टक्के बदल गृहीत धरला होता, तो ६५ टक्के झाला. तुरीत १० टक्के बदल अपेक्षित होता, तो १५ टक्के झाला. मुगात २२ टक्के बदल अपेक्षित होता तो १६ टक्के झाला. उडदात ६१ टक्के बदल अपेक्षित होता तो ६९ टक्के झाला. सोयाबीनमध्ये २५ टक्के बदल अपेक्षित होता तो ३० टक्के झाला, तर कापसात ७४ टक्के होता, तो ८७ टक्के झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com