Pre Monsoon Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Pre Monsoon Rain : लातूरला पूर्वमोसमी पाऊस

Rain Update : लातुर जिल्ह्यात रविवारी (ता. २) सायंकाळी जोरदार पूर्वमोसमी पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने झाडे उन्मळून पडली तरी भाजापाला व फळपिकांचे नुकसान झाले.

Team Agrowon

Latur News : लातुर जिल्ह्यात रविवारी (ता. २) सायंकाळी जोरदार पूर्वमोसमी पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने झाडे उन्मळून पडली तरी भाजापाला व फळपिकांचे नुकसान झाले.

जळकोट, अहमदपूर, चाकूर, निलंगा, औसा, उदगीर व देवणी तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. यात वीज पडून वागदरी येथील कोपीत थांबलेले शेतकरी भाऊवराव वाकसे (वय ७०) यांचा मृत्यू झाला.

सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. कधी ऊन तर कधी सावलीत वातावरणात उकाडा होता. यातच ढग दाटून काही भागांत दुपारनंतर तर काही भागांत सायंकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली.

यात काही भागांत तासभर पाऊस पडत होता. यामुळे नाल्यांतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहिले. काही भागात झाडे उन्मळून पडल्याने रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली.

यात अहमदपूर येथील उमाजी हारणे यांचे दोन बैल, सताळा बुद्रुक (ता. उदगीर) येथील त्र्यंबक वाघमारे यांची एक म्हैस तर गुडसुर येथील राजपाल मुस्कावाड यांची एक म्हैस वीज पडून मरण पावली. कुणकी (ता. जळकोट) येथे घरांवरील पत्रे उडाले तर शेतात रचून ठेवलेला कडबा अस्ताव्यस्त झाला. वादळामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver: सवलतीचा संशयकल्लोळ

Baramati Water Crisis: बारामतीचा जिरायत भाग तहानलेला

Digital Mapping: शेत-पाणंद रस्त्यांचे ‘डिजिटल मॅपिंग’

Farmers Support: आंदोलन सुरू असले तरी शेतकऱ्यांना सेवा सुरूच; आकृतिबंध रद्दसाठी लढा सुरू; कृषी सेवा महासंघाची माहिती

NCP Meeting 2026: दुष्काळी स्थितीवर राष्ट्रवादीची बैठक; मुंबईत २८ सप्टेंबरला शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा

SCROLL FOR NEXT